इंग्रज मिशनरी फादर थॉमस स्टिफन्स याने गोव्यात वास्तव्य केले. आपल्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी गोव्यातल्या प्रचलित बोलीभाषा मराठी आणि कोंकणी आत्मसात करून त्याने या भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती केली. गोव्यातील कोंकणी या बोलीभाषेला युरोपियन लोक पूर्वी ‘कानारी’ असा उल्लेख करीत. किनारपट्टीतील लोकांची भाषा या अर्थी. फादर स्टिफन्सने केलेल्या ग्रंथनिर्मितीपकी ‘ख्रिश्चन पुराण’, ‘दौत्रिना क्रिस्तां’ आणि ‘कानारी भाषेचे व्याकरण’ हे विशेष महत्त्वाचे आहेत.

सुरुवातीच्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी गोव्यातील अनेक लोकांचे धर्मातर केले. त्या वेळी त्यांना जुने धर्मग्रंथ जवळ बाळगण्यावर बंदी घातली. या लोकांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान नव्हते तसेच या धर्माचे बायबलसारखे धर्मग्रंथ लॅटिन अगर पोर्तुगीज भाषेत असल्यामुळे ते त्यांना आकलन होत नव्हते. त्यामुळे ख्रिश्चन धर्म कौन्सिलने धर्मोपदेशकांना स्थानिक भाषांमध्ये धार्मिक साहित्यनिर्मितीचा आदेश दिला होता. या कारणांमुळे स्टिफन्सने आपली साहित्य निर्मिती मराठी आणि कोंकणीत केली.

World Press Freedom Day India first newspaper Bengal Gazette James Augustus Hicky
World Press Freedom Day: भारतातील पहिलं वृत्तपत्र Bengal Gazette चा इतिहास माहिती आहे का?
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक

फादर थॉमस स्टिफन्सने १६१४ साली लिहिलेले ख्रिश्चन पुराण ऊर्फ ख्रिस्तपुराण याला मध्ययुगीन काळात एका परकीयाने मराठीत केलेली पहिली साहित्यनिर्मिती म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. kDiscurso Sobre Avinda De Jesu Christo Nosso Salvador Ao mundol असे लांबलचक मूळ पोर्तुगीज नाव असलेला पण मराठी भाषेत आणि रोमन लिपीत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे ओवीबद्ध स्वरूपातले मराठी बायबल आहे. पहिले पुराण आणि दुसरे पुराण अशा दोन खंडांमध्ये १६१४ साली लिहून पूर्ण झालेल्या या ग्रंथाच्या सन १६१६, १६४९ आणि १६५९ मध्ये अशा तीन मुद्रित आवृत्त्या निघाल्या.

स्टिफन्सने मराठी भाषेचा अभ्यास करताना महाभारत, ज्ञानेश्वरीसारख्या महाकाव्यांचाही अभ्यास केला होता. ख्रिश्चन पुराण लिहिताना स्टिफन्सने थेट ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारख्या जुन्या महाराष्ट्रकवींच्या धर्तीवर ओवीबद्ध, प्रासादिक मराठी ग्रंथरचना केली आहे. ख्रिश्चन पुराण हा मराठी ग्रंथ एका परकीय, युरोपियन माणसाने लिहिलाय ही गोष्ट अविश्वसनीय वाटते!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com