scorecardresearch

Premium

कुतूहल : समुद्रतळावरील नक्षीदार वर्तुळे

जपानमध्ये १९९५ साली एका स्कूबा पाणबुडय़ाला समुद्राच्या तळाशी वाळूत सुंदर नक्षी असलेले भले मोठे वर्तुळ दिसले. त्यावेळी कॅमेरा असल्याने फोटोही काढता आले.

under the sea world circle
कुतूहल : समुद्रतळावरील नक्षीदार वर्तुळे

डॉ. सीमा खोत

जपानमध्ये १९९५ साली एका स्कूबा पाणबुडय़ाला समुद्राच्या तळाशी वाळूत सुंदर नक्षी असलेले भले मोठे वर्तुळ दिसले. त्यावेळी कॅमेरा असल्याने फोटोही काढता आले. त्यानंतर शोध घेता त्याचसारखी आणखीही काही वर्तुळे जवळपास दिसली. त्यावेळी युरोपमध्ये शेतातील, पिकांमध्ये अचानकपणे दिसणाऱ्या रहस्यमय वर्तुळांसारखे हेही असावे असा सर्वसाधारण समज झाला होता, म्हणून त्यांना ‘अंडरवॉटर क्रॉप सर्कल्स’ असे म्हटले जाऊ लागले. मात्र, २०११ साली त्यांचे गूढ उकलले.

ocean temperature
UPSC-MPSC : महासागरातील पाण्याच्या तापमानाचे वर्गीकरण कसे केले जाते?
see world
कुतूहल : सागर तळातील उष्णजलीय निर्गम
Terrace Garden Health benefits Radish carrot
गच्चीवरची बाग: परसबागेतील गाजर, मुळा
kutuhal butterfly fish
कुतूहल : सागरातील छद्मावरण

समुद्रतळावरील या वर्तुळांची निर्मिती अंगावर पांढरे ठिपके असणाऱ्या, केवळ तळहातावर मावणाऱ्या छोटय़ा फुग्या माशाची (पफर फिश) करामत होती. हा मादीला आकृष्ट करण्यासाठीचा खटाटोप होता असे निरीक्षणांतून दिसून आले. हा मासा प्रजनन काळात वर्तुळाकार दिशेत दिवस-रात्र पोहत राहून, परांची जोरदार हालचाल करीत वाळू उकरून खाचा आणि उंचवटे निर्माण करतो. केवळ ५ ते ७ इंच लांबीचा हा मासा, ७ ते ८ फूट व्यासाचे वर्तुळ तयार करतो तसेच प्रवाळ आणि शिंपल्यांच्या तुकडय़ांनी त्याची सजावटही करतो. हे वर्तुळ मध्यभागी उंच होत गेलेले असते त्याजागी बारीक मऊ वाळू आणून गादी तयार करतो. एक वर्तुळ पूर्ण करण्यास नराला सात ते नऊ दिवस लागतात.

घरटे पूर्ण झाल्यावर मादी ते पाहण्यास येते. मादीचे लक्ष वेधण्यासाठी नर मध्यभागी राहून मऊ वाळूची घुसळण करतो आणि ते घरटे तिच्या पसंतीस उतरल्यावर त्यांचे मीलन होते. वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या मऊ गादीवर अंडी घालून मादी निघून जाते. नर त्यावर शुक्राणू सोडून त्यांचे फलन करतो आणि त्यातून पिल्ले बाहेर पडून, पोहण्यास सक्षम होईपर्यंत पुढील सहा दिवस अंडय़ांची राखण करतो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या जागी जाऊन दुसरे वर्तुळ निर्माण करतो. एकदा वापरलेले घरटे पुन्हा वापरले जात नाही. कालांतराने पाण्याबरोबर ते वाहून जाते. काही अभ्यासकांच्या मते हा मासा रंगाने आकर्षक नसल्याने, मादीला आकृष्ट करण्यासाठी ही योजना असावी. हा मासा अत्यंत विषारी असला तरी, जपानमध्ये योग्य प्रकारे प्रक्रिया करून शिजवून आवडीने खाल्ला जातो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal in japan 19 a scuba submarine sea embossed circles on the sea floor ysh

First published on: 27-09-2023 at 03:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×