हॉलीवूडच्या एका आगामी चित्रपटासाठी जपानी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली ‘एरिका’ ही रोबो अभिनेत्री ‘बी’ या चित्रपटासाठी नायिकेची प्रमुख भूमिका करत आहे,  या ‘बी’ सिनेमाचे बजेट सुमारे ५०० कोटी आहे.

एरिका ही रोबो अभिनेत्री, हा चित्रपट क्षेत्रातील एक नवा प्रयोगच आहे. ती दिसायला एका तरुण मुलीसारखीच दिसते. जपानी मुलीचे रूप असलेल्या या अभिनेत्रीची त्वचा सिलिकॉनची बनविलेली असून तिला १४ इन्फ्रारेड संवेदक लावलेले आहेत. या अवरक्त संवेदकांद्वारे तिला समोर कोण बसले आहे याचा अंदाज येतो. ती बोलू शकते. तिच्या मानेच्या चेहऱ्यावरील स्नायूंच्या सिलिकॉनच्या हालचालीही होतात. फक्त तिच्या हातापायांच्या हालचाली सीमित  आहेत. तिची मानसुद्धा डाव्या आणि उजव्या बाजूला २० अंशांच्या कोनातच वळते. हा प्रयोग यशस्वी झाला तर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात एक क्रांतीच होणार आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
yodha-sidharth-malhotra
पहिला पगार आणि बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल सिद्धार्थ मल्होत्रा प्रथमच बोलला; ‘या’ कामातून मिळालेली ‘इतकी’ रक्कम

अशाच प्रकारचे दोन चित्रपट ‘रिबेल मून भाग-२’ आणि ‘अ‍ॅटलास’ हे २०२४ मध्ये येऊ घातले आहेत. 

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : दोन उत्कृष्ट मार्गदर्शक

याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृष्णधवल चित्रपट रंगीत करण्यासाठीही करतात. त्या काळी फक्त कृष्णधवल फिल्म उपलब्ध असल्यामुळे त्यात वापरलेल्या रंगीत कपडयांचे चित्रण फिल्मवर काळया, पांढऱ्या तसेच वेगवेगळया करडया रंगाच्या छटांमध्ये होत असे. जर मूळ कपडयाचा रंग लाल असेल तर, त्याची करडी छटा वेगळी असते. मूळ रंग निळा असेल तर त्याची करडी छटा आणखी वेगळी असते. या करडया रंगाच्या छटांचे सॉफ्ट्वेअर मार्फत पृथ:करण करून मूळ रंग कोणता होता याचा नक्की अंदाज लागतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृष्णधवल चित्रपट रंगीत केला जातो. 

मानवी मेंदूमध्ये विचार करण्याची एक वेगळीच क्षमता असते व त्याद्वारे आपण वेगवेगळया सत्य आणि कल्पित घटनांविषयी लिहू शकतो,  ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ च्या वापरानेसुद्धा असे लेखन करता येईल काय याचा सध्या प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचे स्वामित्व अधिकार नेमके कोणाचे यावरची भूमिका अजून तरी स्पष्ट झालेली नाही. त्यामुळेच सध्यातरी अशा लेखनाला पारितोषिके न देण्याचा निर्णय ‘ऑस्कर’ देणाऱ्या अकॅडमीने तसेच काही चित्रपट-महोत्सवांनीही घेतला आहे .

कृत्रिम बुद्धिमत्तेचा कधी कधी गैरवापरसुद्धा होतो आणि त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तीचे विकृत चित्रण दाखविले जाऊ शकते. हा वापर आपणास नक्कीच टाळता येईल. शेवटी कुठलेही तंत्रज्ञान नेमके कोण वापरते, यावरच त्याचा भविष्यकाळ ठरेल.

उज्ज्वल निरगुडकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

‘कृत्रिम बुद्धिमत्ता: दोन उत्कृष्ट मार्गदर्शक’ हा २९ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख श्याम तारे यांनी लिहिलेला आहे.