दसरा, दिवाळी अशा सणांना दारावरील तोरणात आपण झेंडूची फुले ओवतो. आपल्या अंगणात, बाल्कनीत झेंडूची झाडे लावतो. एकूणच आपल्याला खूप जवळची वाटणारी झेंडू ही वनस्पती मूळची भारतीय नाही. या वनस्पतीचे मूळ मेक्सिकोमध्ये आहे. कंपॉझिटी या कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅजेट्स इरेक्टा असे आहे. झेंडूचे झुडूप वाढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हवामान किंवा जमीन आवश्यक नसते. कोणत्याही प्रकारचे हवामान झेंडूला मानवते.

झेंडूची पाने एकाआड येतात. पानावर बारीक लव असते आणि आकारही विशिष्ट असा असतो. पानांना एक वेगळाच गंध असतो. झेंडूची काही फुले एकेरी असतात, काही मोठी गोंडय़ासारखी असतात. पुष्पबंधात दोन प्रकारची फुले एका ठिकाणी जोडलेली असतात, आपण ज्या भागाला पाकळी समजतो ती पाकळी नसून ती अनेक फुले आहेत. त्यांना रे फ्लोरेट्स असे म्हणतात. मधल्या भागावर डिस्क फ्लोरेट्स असतात. अशाच प्रकारची फुले सूर्यफूल, झेनिया, अ‍ॅस्टर, जब्रेरा या वनस्पतींमध्ये स्पष्ट दिसून येतात. नारिंगी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या अनेक जाती आहेत.

The story of Nach Gan Ghuma Madhugandha Kulkarni loksatta adda
घराघरातल्या घुमाची गोष्ट
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू हे झेंडूचे काही पारंपरिक प्रकार आहेत. अफ्रिकन झेंडू या प्रकारच्या झेंडूचे झाड एक ते दीड मीटपर्यंत वाढते. झेंडूच्या रंगानुसार या जातीमध्ये बरेच प्रकार आहेत.

फ्रेंच झेंडू : या प्रकारातील झाडांची उंची ३० ते ४० सेंमी एवढीच असते. या जातीच्या झेंडूची लागवड बागेचे किंवा रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केली जाते.

पुसा नारिंगी, पुसा बसंती अशा काही सुधारित आणि संकरित जातीही झेंडूमध्ये आहेत. झेंडूचे बियाणे पेरल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर फूल यायला सुरुवात होते. झेंडूचे स्वतंत्र पीक घेतले जाते. किंवा द्राक्ष, पपई अशा फळांच्या बागांमध्येही झेंडूची लागवड केली जाते.

भारतातील कर्नाटक राज्य झेंडू उत्पादनात अग्रेसर समजले जाते. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते. कान दुखत असेल तर झेंडूच्या पानाचा रस कानात घालतात. गळू या विकारावरही झेंडूच्या रसाचा उपयोग केला जातो.

– सुचेता भिडे  (कर्जत)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

 

अलेक्झांड्रिया

इजिप्तच्या उत्तरेकडील भागात, भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसलेले अलेक्झांड्रिया हे इजिप्तमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि मोठे बंदर आहे. इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट याने स्थापन केलेले हे शहर जगातील प्राचीन काळातील सर्वात प्रसिद्ध शहरांपकी एक होते. ६४१ च्या सुमारास अरब मुस्लीमांनी अलेक्झांड्रियावर कब्जा करेपर्यंत, म्हणजे सुमारे एक हजार वष्रे अलेक्झांड्रिया हेलिनिस्टिक संस्कृतीचे प्रमुख केंद्र आणि रोमन आणि बायझंटाईन साम्राज्यांच्या इजिप्तमधील प्रशासनाची राजधानी बनून राहिले. या काळात रोम नंतर जगातील सर्वाधिक प्रबळ शहर म्हणून अलेक्झांड्रिया ओळखले जात होते. आधुनिक जगात अलेक्झांड्रिया दिवसेंदिवस जरी विस्मृतीत जात असले तरी ते तिथल्या प्राचीन लायब्ररीसाठी आणि ‘राणी  क्लिओपात्राचे शहर’ म्हणून ओळख राखून आहे.

अलेक्झांडरने हे शहर वसवताना त्याचा वास्तुविशारद डिनोक्रेटस याने नगररचना आणि नियोजन केले. अलेक्झांडरने टोलेमी प्रथम सॉटर याला इजिप्तच्या आपल्या राज्याचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर या टोलेमी सॉटरने काही काळाने स्वतचा अंमल या प्रदेशावर सुरू केला. अलेक्झांड्रिया ही राजधानी ठेवून टोलेमी घराण्याने संपूर्ण इजिप्तवर इ.स.पूर्व ३२३ ते इ.स.पूर्व ३० या काळात (साधारणत तीन शतके) राज्य केले. क्लिओपात्रा सातवी ही टोलेमी घराण्याची शेवटची राज्यकर्ती. टोलेमी घराण्यातील १३वा टोलेमी आणि राणी क्लिओपात्रा सातवी यांच्यामध्ये झालेल्या बेबनावात रोमन सिनेटर जूलीयस सिझर याने हस्तक्षेप करून इ.स.पूर्व ४७ मध्ये अलेक्झांड्रियात रोमन सत्तेचा शिरकाव केला.

इ.स. ११५ मध्ये तत्कालीन बायझंटाईन सम्राट आणि ज्यू नेत्यांमध्ये झालेल्या चकमकींना किटोंचे युद्ध म्हणतात. या चकमकींमध्ये अलेक्झांड्रिया शहराची बरीच पडझड झाली. पण या संधीचा उपयोग करून सम्राट हेड्रियनने शहर परत नव्याने बांधून काढले. ३६५साली आलेल्या प्रचंड त्सुनामीने, अलेक्झांड्रियाचा मोठा विध्वंस झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com