प्रो. दस्तुर यांनी १९१८ साली गुजरात कॉलेज, अहमदाबाद येथून बी.एस्सी. डिग्री संपादन केली आणि त्याच कॉलेजमध्ये वनस्पतिशास्त्राचे डेमॉन्स्ट्रेटर म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांनी एमएस्सी डिग्री संशोधनाद्वारे मिळवली. नंतर लगेच १९२४-२५ या एका वर्षांसाठी ते युनिव्हर्सटिी ऑफ रीडिंग यू.के. येथे गेले, पाणी आणि प्रकाश संश्लेषण यांच्या संशोधनावर प्राथमिक स्वरूपाचे काम केले. आपले संशोधन निष्कर्ष ‘अ‍ॅनलॅस् ऑफ बॉटनी’ या मानाच्या नियतकालिकात प्रसिद्ध केले. परदेशातून परतल्यावर प्रा. दस्तुर यांनी असिस्टंट लेक्चरर म्हणून रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये वनस्पतिशास्त्र विभागात नोकरी स्वीकारली. याच विभागात नंतर ते विभागप्रमुख झाले. (१९२९-३५) या काळात त्यांनी वनस्पती विभागात एक सक्रिय प्लॅन्ट फिजिओलॉजीचा विभाग तयार केला.

आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांनी भाताच्या रोपांमधील आद्र्रता आणि हरितद्रव्य याचा प्रकाश संश्लेषण क्रियेवर होणारा परिणाम या विषयात काम केले. आणि शोधनिबंध ‘अ‍ॅनलॅस ऑफ बॉटनी’ आणि ‘जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी विभागप्रमुखपद सोडले आणि आपले लक्ष उपयोजित वनस्पती शरीरविज्ञान या विषयावर केंद्रित केले. प्रामुख्याने कापसावर काम केले. त्या सुमारास पंजाबमध्ये कापसाच्या पिकावर ‘तिरक’ हा रोग पसरला होता. पौष्टिक द्रव्यांच्या अभावी पाने पिवळी पडणे आणि बोंड फुटणे या कारणांनी कापसाच्या पदाशीवर परिणाम होत होता. प्रा. दस्तुर यांना इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी यांनी अभ्यास करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी त्यांचे शोधकार्य आणि त्याचे परिणाम नेचर या जगश्रेष्ठ जर्नलमध्ये प्रसिद्ध केले. १९५१ साली प्रा. दस्तुर लौकिक अर्थाने निवृत्त झाले. पण कॉटन कमिटीने त्यांना वैज्ञानिक म्हणून काम करण्यासाठी केलेल्या आग्रहामुळे ते अखेपर्यंत काम करीत राहिले. या काळात त्यांनी कापसावरील इतर रोगांवर संशोधन केले. आणि दोन मोनोग्राफ प्रसिद्ध केले. त्यावर खतांचा योग्य वापर आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचे योग्य प्रमाण प्रामुख्याने अभ्यासले.

jobs
नोकरीची संधी
tiss marathi news, tata institute of social sciences marathi news
लोकसभा निवडणूक होईपर्यंत संकुलात आंदोलन, मोर्चा, कार्यक्रमास बंदी; ‘टिस’कडून परिपत्रकाद्वारे नियमावली जाहीर
up pharmacy college latest news
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक

पंजाबमधील त्यांच्या कापसावरील अग्रणी शोधकार्याबद्दल त्यांना किंग जॉर्ज सहावे यांनी ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ ही पदवी बहाल केली. ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे फेलो होते.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अस्थिर कैरो

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस कैरोचा ताबा ओटोमान तुर्की सुलतानाने घेऊन कैरो ही आपल्या साम्राज्यातील इजिप्त या प्रांताची राजधानी केली. अठराव्या शतकाच्या अखेरीस नेपोलियनने कैरोत आपले सन्य घुसवून कैरोचा ताबा घेतला. नेपोलियनचा कैरोवरील अंमल केवळ १७९८ ते १८०१ अशी चार वष्रे राहून तिथले शासन परत तुर्काकडे आले. तुर्कानी मोहम्मद अली हा आपला लष्करी अधिकारी कैरोमध्ये आपला गव्हर्नर म्हणून नेमला. मोहम्मद अलीने कैरो ही राजधानी ठेवून इजिप्तवर स्वत:चाच अंमल बसवून १८०२ ते १८५२ असे राज्य केले. त्याने चांगल्या लांब बोंडाच्या कापसाची लागवड करून त्याच्या व्यापारावर कैरोमध्ये भरभराट आणली, सुवेझ कालव्याचे काम सुरू केले. त्याच्या पुढच्या पिढीने सुवेझ कालवा बांधून पूर्ण केला, परंतु स्वत:च्या ऐशोआरामी जीवनासाठी वाटेल तशी उधळपट्टी करून राज्य दिवाळखोरीत काढले. अखेरीस त्यांना सुवेझ कालवा ब्रिटिशांना विकून भरपाई करावी लागली. १८८२ साली कैरोचा ताबा ब्रिटिश राजवटीने घेतला आणि चाळीस वष्रे आपला अंमल गाजवून पहिल्या विश्वयुद्धानंतर १९२२ साली त्यांनी कैरोचे शासन राजा फौद प्रथम याच्या सुपूर्द केले. असे असूनही कैरोच्या संरक्षणाच्या निमित्ताने ब्रिटिशांचा लष्करी तळ कैरोच्या परिसरात १९३६ सालापर्यंत राहिला. १९२८ साली कैरोत ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या इस्लामी प्रतिगामी विचारसरणीची चळवळ सुरू झाली. १९४८ साली इजिप्त, इराक आणि जॉर्डनच्या लष्करी युतीचे, नवजात देश इस्रायलबरोबर झालेल्या युद्धात युतीच्या झालेल्या पराभवामुळे संतापलेल्या लोकांनी तत्कालीन राजे फारुखविरुद्ध उठाव करून राज्यक्रांती केली आणि १९५३ मध्ये प्रजासत्ताक सरकार स्थापन केले. महम्मद नजीब, गमाल अब्दुल नासर, अन्वर सादात, होस्नी मुबारक असे नेते इ.स. २०११ पर्यंत इजिप्तच्या अध्यक्षपदी राहिले. परंतु सततचे उठाव, बंड यामुळे होस्नी मुबारकने सत्ता लष्कराच्या स्वाधीन केली. इ.स. २०१२ ते २०१४ या काळात मोहम्मद मोर्सी हे अध्यक्ष व पुढे २०१४ पासून अब्दुल फताह अल् सिसी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com