15 August 2020

News Flash

देशप्रेम म्हणजे काय रे भाऊ?

आमच्या कॉलेजमध्ये तर २५ आणि २६ या दोन्ही दिवशी सुट्टी मिळावी म्हणून लोकांनी २५ तारखेची कामंसुद्धा आधीच उरकली..

दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी आले, की त्याला जोडून सुट्टी कशी घ्यायची आणि मजा कशी करायची याचे प्लॅन सुरू होतात. या दिवसांना झेंडावंदन करणं महत्त्वाचं असलं तरी ते करणं म्हणजेच देशप्रेम का? वाचा तरुणाईची मतं..

Tejal
January 20 at 9:31am

या वेळेस २६ जानेवारी मंगळवारी असल्याचं समजलं तेव्हा पहिला विचार हाच मनात आला, की सोमवारी आला असता तर लागून तीन दिवस सुट्टी मिळाली असती आणि माझ्याच नाही अनेकांच्या मनात हे आले. तशी चर्चापण झाली ऑफिसमध्ये.
Like · Comment · Seen by 4

 
Rutuja : हाहाहा.. आमच्या कॉलेजमध्ये तर २५ आणि २६ या दोन्ही दिवशी सुट्टी मिळावी म्हणून लोकांनी २५ तारखेची कामंसुद्धा आधीच उरकली.. म्हणजे आता असं झालंय की, हक्काची सुट्टी मिळाली तर देश महान.. नाही तर काही खरं नाही..!
Like · Reply · January 20 at 6:54pm · Edited
Tejal  : हाहा.. हो २५ ला सुट्टी टाकायचा अनेकांनी प्लॅन केला होता. टाकलीही सुट्टी. २६ जानेवारीला एक हक्काची सुट्टी म्हणून जास्त बघितले जाते हे खरंय आणि त्यात मला काही गैर वाटत नाही. पूर्ण वर्षांत फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला वरवरचं देशप्रेम दाखवण्यापेक्षा तो दिवस आनंदात आपल्या प्रिय जनांबरोबर घालवलेला बरा.
Unlike · Reply · 1 · January 20 at 8:20pm

Rutuja : बरोबर आहे गं.. पण बहुधा निदान या दिवशी तरी आपण देशप्रेम दाखवावं, ही माफक अपेक्षा असावी सुट्टी देण्यामागे.

Like · Reply · January 20 at 8:41pm

Tejal : मी हीच कॉमेंट एक्सपेक्ट करीत होते यावर. पण एक दिवस देशप्रेम दाखवल्यामुळे खरंच मनात प्रेम निर्माण होतं देशाबद्दल? आय नो की एक दिवस तरी ज्या लोकांनी आपल्या देशासाठी आयुष्य वेचलं, प्राणाची आहुती दिली त्यांच्या आठवणीत हा दिवस घालवला पाहिजे, कारण एरवी त्यांची आठवण आपल्याला येत नाही किंवा देशाची सेवा करण्याचा एक संकल्प तरी केला पाहिजे. साध्यातला साधा संकल्प म्हणजे उद्यापासून रस्त्यावर कचरा न टाकणे. पण हे सगळं करताना कोणी दिसत नाही. व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर स्टेटस आणि डीपी टाकला की झालं देशप्रेम.

Like · Reply · 1 · January 20 at 9:14pm

Sanket :  ‘ऑफिस ला ये, काय करणारेस तसाही २६ जानेवारीला?’ इति एक कलिग महाशय!

महिनाअखेर आला की लोकांना रखडलेली कामे आठवतात आणि मग सुट्टीचा शनिवार असो, रविवार असो किंवा एखादा

२६ जानेवारीसारखा ‘डिक्लेर्ड हॉलिडे’.. ऑफिसला येऊन कामाचे डोंगर उपसावे, अशी अपेक्षा असते.

Like · Reply · January 20 at 10:09pm

 

Rutuja : एक्झ्ॉक्टली..मान्य आहे.. मी तशी कॉमेंट केली, कारण आपण आपलं कुटुंब, आपलं घर याच्या पलीकडे जात नाही.

म्हणजे चित्रपटगृहातसुद्धा राष्ट्रगीताला उभं राहणं आणि जे उभे राहात नाहीत त्यांना बाहेर काढणं म्हणजे आपलं आपल्या देशावर प्रेम आहे असं होत नाही ना? १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला विकत घेतलेले झेंडे आपण आपल्याकडे सांभाळून ठेवले तरी खूप आहे..

Like · Reply · 1 · January 20 at 10:18pm

Sanket : दोन दिवस देशप्रेमाच्या लाटेचे म्हणण्यापेक्षा, दोन दिवस देशप्रेमासाठी ‘हक्काचे’ म्हणून मला आवडतात.

टी.व्ही.वर लाइव्ह परेड, राज्यांचे रथ पाहून देशाभिमानाने ऊर भरून येतो.

मेरे देश की धरती सोना उगले..

ये देश हे वीर जवानों का..

ए मेरे वतन के लोगों..

मेरा रंग दे बसंती चोला..

ही गाणी रोमांचित करतात.

एरवी ऑफिस, कॉलेज, घर, गर्लफ्रेण्ड, हँगआउट्स वगैरे उपद्व्यापातून किती जणांना देशाची रोज आठवण येते?

माझी तर अर्धी टीम चार दिवस लाँग लीव्हवर होती आणि तेजलप्रमाणे मला त्यात काहीच गैर नाही वाटत.

Like · Reply · 1 · January 20 at 10:32pm · Edited


Tejali : :  खरे आहे. २६ जानेवारीची हक्काची सुट्टी असते, त्यामुळे बरेच लोक आधीपासून प्लॅन्स करतात..

झेंडावंदनला कुणी जात नाही, पण या दिवशी रिसॉॅर्ट्स मात्र हाऊसफुल्ल असतात!

कारण लहानपणापासूनच या दोन सुट्टय़ा कशासाठी आहेत याचं महत्त्व कधी मुलांना नीट समजवलं जात नाही. शाळेत सक्तीने जावे लागते. नंतर कॉलेजमध्ये फक्त एन.एस.एस. आणि एन.सी.सी.च्या मुलांचा दिवस म्हणून बघितले जाते आणि जॉबला लागल्यावर तर ‘हक्काची सुट्टी’..

एवढेच नाही तर २६ जानेवारीला नक्की काय झाले होते हे माहीत नसते कित्येकांना.. अगदी त्या दिवशी ड्राय डे पाळणेही लोकांना जमत नाही. तिथे देशभक्ती, समाजसेवा वगैरे खूप दूरच्या गोष्टी.

Like · Reply · 1 · January 20 at 10:32pm · Edited

Greeshma :   तेजाली, तू म्हणतेयस ते खरे आहे. लहानपणापासून या दोन दिवसांचे महत्त्व नीट समजावले जात नाही. माझा त्यापुढचा मुद्दा असा आहे की, एक दिवस देशप्रेम म्हणून देशभक्तिपर गाणी ऐकायची, तसे पिक्चर बघायचे, झेंडावंदन करायचे पण मग मित्रांनो, दुसऱ्याच दिवशी हे तुमचे देशप्रेम जाते कुठे? दुसऱ्या दिवशी हेच झेंडे पायदळी तुडवले जातात. आदल्या दिवशी ताठ मानेने फडकणाऱ्या झेंडय़ाचे दुसऱ्या दिवशी काय होते?

Like · Reply · 9 hrs

 

Sanket :  २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टनंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन दुर्लक्षित झेंडय़ांची काळजी घेतात काही देशभक्त

Like · Reply · 1 · 9 hrs

 

Greeshma अरे, पण जर प्रत्येकाला खरेच देशप्रेम मनापासून वाटत असेल ना तर मग झेंडे रस्त्यावर पडणारच नाहीत

Like · Reply · 9 hrs

Sanket :  झेंडय़ाचा अपमान निंदनीयच आहे.

सिग्नलवर झेंडे विकणारी चिमुकली दिसली आज.. अगतिक होती, भुकेलेली, थकलेली दिसत होती.

आज झेंडा हा तिचा विक्रीचा ‘माल’ होता, वर्षांतून दोन दिवस काय ती त्याला किंमत. त्यापलीकडे तिला कशी उमजेल देशभक्ती?

Like · Reply · 9 hrs

Tejali : तेजलच्या मताबरोबर मी पूर्णपणे सहमत नाही खरे तर.. कारण मी लहानपणापासून अजूनही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सकाळी ध्वजवंदनाला जाते. आमच्या सोसायटीमध्ये सगळे एकत्र जमून झेंडावंदन करतात, राष्ट्रगीत म्हणतात, देशभक्तिपर गाणी ऐकतात. त्याने मला स्फूर्ती मिळते. या दिवशी आपण सुट्टीसारखे झोपून राहणे, बाहेर जाऊन एन्जॉय करणे हे त्यामुळे आता मनाला कधीही पटणार नाही. चुकून जरी मिस झाले तरी मनाला रुखरुख लागते. हे दोन दिवस फक्त देशभक्तीचे असतात का? तर नाही!!  पण हे दोन दिवस नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत, कारण त्यानिमित्ताने सर्वानी एकत्र येणे, देशभक्तीचे स्फुरण घेणे मला आवडते आणि पटते.

अर्थात बाकीच्या दिवशीसुद्धा देशभक्ती दाखवलीच पाहिजे. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधूनही देशसेवा करता येते.

भ्रष्टाचार न करणे, स्वदेशी वस्तू वापरणे, देश स्वच्छ ठेवणे, या सगळ्याच गोष्टी देशभक्ती म्हणून सहज आपण करू शकतो..

Like · Reply · 8 hrs

Tejal :  तेजाली, तुझ्यासारखे मनापासून २६ जानेवारी साजरा करणारे आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे आणि या दिवसापुरता झेंडा विकत घेऊन दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकणारे जास्त आहेत.

Like · Reply · 22 mins · Edited

Rutuja : हं.. बरोबर आहे तेजल. आमच्या सोसायटीत जेव्हा ध्वजवंदन होतं तेव्हा दोन-तीन तरुण सोडल्यास कुणीच नसतात. कॉपरेरेटमध्ये काम करीत असल्याने मनसोक्त झोपून निद्रादेवीवरचे प्रेम दाखवून देतात. तरुणांचे दोन गट आहेत खरे तर. म्हणजे एक ज्यांना देशाची काहीही पडलेली नाही आणि दुसरे म्हणजे ज्यांना खरेच फिकीर आहे; पण योग्य मार्ग माहीत नाही. दुसऱ्या गटातटांतल्यांनी पहिल्या गटातटांतल्यांना आपल्या गटात आणलं तरी खूप आहे असं वाटतं मला.

Like· Reply· Just now

(चर्चा सहभाग : तेजल शृंगारपुरे, तेजाली कुंटे, संकेत पाटोळे, ऋतुजा फडके व ग्रीष्मा जोग-बेहेरे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:21 am

Web Title: loving your nation
टॅग Nation,Social Media
Next Stories
1 स्वातंत्र्य समलिंगी शरीरसंबंधांचे!
Just Now!
X