पालघर : पालघरच्या समुद्रात मासेमारी क्षेत्रामध्ये बेकायदा ट्रॉलर्सनी धुमाकूळ घातल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने या क्षेत्रात धाडी टाकून केलेल्या कारवाईमध्ये मासेमारी जाळी व त्यातील मासे असे सुमारे १० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. परंतु यावेळी ट्रालर्स पळून जाण्यात यशस्वी ठरले.

सातपाटीसमोर गुरुवारी  रात्रीच्या सुमारास गस्तीदरम्यान ९ सागरी मैल सातपाटीसमोर गुरुवारी रात्रीच्या सुमारास गस्तीदरम्यान ९ सागरी मैल अंतरावर निषिद्ध क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या २५ ते ३० ट्रॉलर दिसून आल्या. या नौका एका ओळीत समूहाने ट्रालिंग पद्धतीने मासेमारी करीत होत्या. या अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न मत्स्यव्यवसाय विभागाने केला, मात्र बेकायदा नौका तंत्रज्ञानने विकसित असल्यामुळे त्या नौका पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. मात्र यापैकी एका  नौकेने आपले मासेमारीसाठी सोडलेले ट्रॉल जाळे दोर कापून जागेवर सोडून पळ काढला होता. पाण्यात सोडलेले जाळे व त्यामधील शिंगाळी व इतर जातीचे अंदाजे १५० किलो मासे मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांच्या गस्ती नौकेद्वारे ताब्यात घेतले. जप्त मासळीचा सातपाटी बंदरावर लिलाव करण्यात आला.

लिलावत एकूण उच्चतम बोलीप्रमाणे रु. नऊ हजार १०० रुपये इतक्या रकमेस मासळीची विक्री करण्यात आली. कारवाईसाठी अत्याधुनिक नौका  आणि सुरक्षा साधनांची गरज समुद्रामध्ये बेकायदा पद्धतीने केली जाणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे विकसित नौका नसल्यामुळे कारवाईसाठी जाताना पर्ससीन व बोटी पळून जाण्यात यशस्वी ठरत आहेत. आजही मत्स्यव्यवसाय विभाग पारंपरिक नौकांचा गस्तीसाठी वापर करत आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत मत्सव्यवसाय विभागाला तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अतिजलद नौका तसेच सुरक्षा साधने पुरवण्याची मागणी समोर येत आहे.