scorecardresearch

Premium

अवकाळी पावसाचा पालघर जिल्ह्याला फटका; ५४८ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, सुक्या मासळीचे नुकसान

२५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे ५४७.८५ हेक्टर कृषी क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Unseasonal rain hits Palghar district
अवकाळी पावसाचा पालघर जिल्ह्याला फटका; ५४८ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, सुक्या मासळीचे नुकसान (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पालघर : २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे ५४७.८५ हेक्टर कृषी क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या संदर्भातील सविस्तर पंचनामे करण्याची कारवाई हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.

पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे डहाणू व तलासरी वगळता उर्वरित सर्व सहा तालुक्यांमध्ये कृषी क्षेत्रावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रफळामध्ये भात शेतीचे सुमारे ९० टक्के प्रमाण असून नागली व भाजीपाला लागवडीचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभाग तसेच संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली आहे.

Beating_f9bb1c
अरे बापरे! ग्रामसभेतच निघाली तलवार, कुऱ्हाड अन् मग…
Four times increase in dengue patients in East Vidarbha
नागपूर : पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत चारपट वाढ!
sexual abuse minor girl amravati district hospital multai village madhya pradesh marathi
अमरावती : मामाने केले १४ वर्षीय भाचीचे लैंगिक शोषण; वैद्यकीय तपासणीनंतर…
16 suspects detained in case of offensive message in Nandgaon taluka
नांदगाव तालुक्यात आक्षेपार्ह संदेशप्रकरणी १६ संशयित ताब्यात

हेही वाचा – सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी

सुक्या मासळीचे नुकसान

डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यात समुद्रकिनारी गावी मासळी सुकवणाऱ्याचे अवेळी पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसंचालक दिनेश पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – धानीवरीत गावदेव निमित्त गावात बाल विवाह रोखण्यासाठी नियम; गावाचा स्वागतार्ह उपक्रम

२६ व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचे प्राथमिक अंदाजानुसार पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राप्त माहितीनुसार निदर्शनास आलेले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unseasonal rain hits palghar district damage to about 547 hectares of agricultural area ssb

First published on: 28-11-2023 at 22:21 IST

आजचा ई-पेपर : पालघर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×