scorecardresearch

Premium

सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी

या अपघातात विळंगी गावातील दुचाकीस्वार विक्रम कमलाकर पाटील (२१) याच्या मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

one person died three others injured accident three two-wheelers Safale Rambagh Palghar
सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकीचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पालघर: पालघर तालुक्यातील सफाळे रामबाग येथे आज सकाळी तीन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. या अपघातात विळंगी गावातील दुचाकीस्वार विक्रम कमलाकर पाटील (२१) याच्या मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने आज पहाटे जिल्ह्याच्या विविध भागात दाट धूके पसरले होते. मृत झालेला दुचाकी स्वार विक्रम हा मुंबईत रात्रपाळी करुन सफाळेहुन विळंगी कडे जात असताना रामबाग जवळ धुक्यामुळे समोर काही न दिसल्याने दुचाकीला धडक दिली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या दुचाकी चालकांनी दोन दुचाकीला धडक दिली. त्यामुळे हा तीन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. या अपघातात विक्रांत पाटील हा जखमी अवस्थेत असताना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. त्याचप्रमाणे विलंगी गावातून येणारे प्रकाश गजजान किणी (५८), पल्लवी प्रकाश किणी (४६) हे पती-पत्नी व माकुणसार येथील जयदीप वर्तक गंभीर जखमी झाले.

farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…
signpost in Navi Mumbai was removed after Flamingos death
फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर नवी मुंबईतील दिशादर्शक फलक हटविला
Youth killed on suspicion of being a thief in Bhayander
भाईंदर: इमारतीच्या गच्चीवरून पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
Video: 25-Year-Old Agra Man Dies Of Heart Attack While Working In Sweet Shop
मिठाईच्या दुकानात काम करताना कोसळला; २५ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

हेही वाचा… पालघर : मराठी फलक लावण्यासाठी दोन दिवसांची मुभा, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागृती करणार

या अपघाताची माहिती सफाळे पोलीसांना मिळतात घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सफाळे पोलीस ठाण्यात अपघाती नोंद करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One person died and three others were injured in an accident involving three two wheelers at safale rambagh in palghar dvr

First published on: 28-11-2023 at 18:44 IST

आजचा ई-पेपर : पालघर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×