०७ जून २०१५
- 1 / 4
चांदिवलीतील पवई फार्मा मार्गावर 'लेक होम' इमारत आहे. शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील १४०३ क्रमांकाच्या सदनिकेला आग लागली. (एक्स्प्रेस फोटो)
- 2 / 4
इतक्यात जन्मलेले बनी प्रजातीचे हरिणाचे पिल्लू सेदार स्प्रिंग येथील एका फार्म हाऊसवर ठेवण्यात आले आहे. या हरिणाच्या आईने ते इतरांमध्ये वेगळे असल्याने त्याला आपल्यापासून दूर केले आहे. (छाया पीटीआय)
- 3 / 4
संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावत अंतिम फेरीत धडक मारणारी ल्युसी सेरेनाला चीतपट करत चमत्कार घडवणार का, अशा चर्चा सामना सुरू होईपर्यंत रंगल्या होत्या. (छाया पीटीआय)
- 4 / 4
केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी बंगळुरूत शनिवारी सरकारविरोधी फलक लावण्यात आले होते. (छाया पीटीआय)