नुकतीच 'सेक्सिएस्ट एशियन मेन २०१७' ची यादी समोर आली. या यादीत समावेश झालेल्या कलाकारांची नावं वाचून आणि त्यांचे हॉट फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. युकेमधील 'द इस्टर आ या वृत्तपत्राने सेक्सिएस्ट एशियन मेनची यादी जाहीर केली. त्यातील पहिल्या सहाजणांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. पण पहिल्या स्थानी कोण असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? हॉट पुरुषांच्या यादीत हृतिक रोशनचे नाव पहिल्या स्थानी नसून त्याला मागे टाकत शाहिद कपूरने हा किताब पटकावला आहे. शाहिद कपूर- 'पद्मावती' स्टार शाहिद कपूरने सेक्सिएस्ट एशियन मेन ठरला. गेल्यावर्षी याच यादीत शाहिद आठव्या स्थानावर होता. पण अवघ्या वर्षभरात त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतली. जानेवारी २०१७ पासून तो सोशल मीडियावर स्टाईल आणि फॅशनशी निगडीत अनेक गोष्टींसाठी ट्रेण्ड होत होता. -
हृतिक रोशन- हॉट पुरूषांमध्ये हृतिक रोशनचे नाव नसेल तर नवलच. यावर्षी तो दुसऱ्या स्थानावर असून टॉप तीनमध्ये आपले स्थान टिकवण्यात हृतिकला यश मिळाले आहे.
-
झयान मलिक- सतत तीन वर्षे सेक्सिएस्ट एशियन मेनचा किताब स्वतःच्या नावावर केल्यानंतर यावर्षी झयानची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. यंदा त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
-
विवियन डीसेना- हॉटनेसमध्ये टीव्ही कलाकारही काही कमी नाहीत हेच यातून दिसते. टीव्ही अभिनेता विवियन डीसेना यादीत चौथ्या स्थानावर आहे.
-
आशिष शर्मा- सध्या आशिष छोट्या पडद्यापासून दूर असला तरी तो अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याने या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.
-
फवाद खान- पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने 'सेक्सिएस्ट एशियन मेन २०१७' च्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

याला म्हणतात ठसका! हळदीत नंदेसमोर वहिणीनं केला जबरदस्त डान्स; VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा