-
शमिता शेट्टी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेला काही काळ सिनेसृष्टीपासून दूर असलेली शमिता आता एका नव्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या या आगामी वेब सीरिजचं नाव 'ब्लॅक विडो' असं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही एक मिस्ट्री, ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेली सीरिज आहे. अलिकडेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या आगामी सीरिजमध्ये शमितासोबत स्वस्तिका मुखर्जी आणि मोना सिंह यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या तीन अभिनेत्री आपल्या पतीपासून विलग होण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु त्यांना त्यात अपयश येतं. परिणामी या तिघी मिळून आपापल्या पतीची हत्या करतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर या केसची चौकशी सुरु होते. या प्रकरणात खरंच त्या तीन पुरुषांची हत्या झाली होती का? या प्रश्नाभोवती या सीरिजची निर्मिती केली गेली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सीरिजमध्ये शरद केळकर, आमिर अली आणि परमब्रत चटर्जी या तिघांनी अभिनेत्रींच्या पतीची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'ब्लॅक विडो' येत्या १८ डिसेंबरला झी ५ वर प्रदर्शित होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case