अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे शशांक केतकरची दुसरी पत्नी; पाहा फोटो
- 1 / 10
मराठी अभिनेता शशांक केतकरच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. पत्नी प्रियांका ढवळे गरोदर असल्याची गोड बातमी शशांकने नुकतीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली.
- 2 / 10
२०१७ मध्ये शशांकने प्रियांकाशी लग्नगाठ बांधली. शशांकचं हे दुसरं तर प्रियांकाचं पहिलं लग्न आहे.
- 3 / 10
प्रियांका वकील असून सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४८ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
- 4 / 10
अभिनेत्री तेजश्री प्रधानला घटस्फोट दिल्यानंतर शशांकची फेसबुकद्वारे प्रियांकाशी ओळख झाली.
- 5 / 10
हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शशांकने फेसबुक प्रोफाइलवर प्रियांकासोबतचा फोटो ठेवून आयुष्यात प्रेम परतल्याची चाहूल दिली.
- 6 / 10
दुसरीकडे प्रियांकानेही तिच्या इन्स्टाग्रामवरून शशांकचा फोटो शेअर करून दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चेला आणखी पक्कं केलं होतं.
- 7 / 10
प्रियांका अभिनय क्षेत्रातली नसली तरी सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
- 8 / 10
तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होत असतो.
- 9 / 10
शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय व प्रसिद्ध चेहरा आहे. 'होणार सून मी या घरची', 'हे मन बावरे' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
- 10 / 10
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, प्रियांका ढवळे)