
हसतमुख चेहरा आणि लाघवी स्वभावाच्या जोरावर अभिनेत्री-निर्माती अलका कुबल यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

आपल्या कौटुंबिक चित्रपटांतून एक काळ गाजवणाऱ्या, रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या अलका कुबल यांनी निर्माती म्हणूनही यशस्वी कारकीर्द उभारली.

अलका कुबल यांच्या लेकीचा इशानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे.

अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत.

या पैकी त्यांची थोरली लेक इशानीने दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

इशानी आणि निशांतच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे.

निशांत मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच स्थायिक आहे.

कलाविश्वातील अनेक कलाकरांना या लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री ते एकटीने मराठी चित्रपट गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेली चित्रपट निर्माती असा खूप मोठा पल्ला अलका कुबल यांनी गाठला आहे.

अलका यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करतेय तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे.

(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)