
बहुचर्चित ‘केजीएफ २’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता रॉकींग स्टार यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

‘रॉकी भाई’ ही भूमिका ‘केजीएफ २’ या चित्रपटात तो साकारणार आहे.

अॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलरलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

‘केजीएफ’ नंतर ‘केजीएफ २’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते.

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात बॉलिवूड कलाकारही झळकणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ‘केजीएफ २’ मध्ये खलनायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात तो ‘अधिरा’ हे पात्र साकारणार आहे.

‘केजीएफ २’मधील संजय दत्तचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

याआधीही संजय दत्तने चित्रपटांत साकारलेल्या खलनायिकाच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या होत्या.

‘खलनायक’ या चित्रपटात पहिल्यांदा तो निगेटिव्ह भूमिकेत दिसला.

या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

‘पानिपत’ चित्रपटात त्याने अहमद शाह अब्दाली हे पात्र साकारलं होतं.

संजय दत्तने साकारलेलं कांचा हे ‘अग्निपथ’ चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

‘मुसाफिर’ चित्रपटात तो मूसा भाई या भूमिकेत दिसला होता.

‘वास्तव’ चित्रपटातील त्याने साकारलेली रघुनाथ ही खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती.

या भूमिकेसाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा फिल्म फेअरचा पुरस्कार देखील मिळाला होता. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)