
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.

तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली आहे.

सोनाली कुलकर्णीने काल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबतची माहिती दिली.

यानंतर आता सोनालीने तिच्या हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.

यात सोनाली ही कुणालसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.

सोनाली आणि कुणाल हे मॅक्सिकोमध्ये हनिमूनसाठी गेले आहेत.

सोनालीने या फोटोंना कॅप्शन देताना ‘Hola de mexico’ असे स्पॅनिशमध्ये म्हटले आहे. ‘मॅक्सिकोहून नमस्कार’ असा याचा अर्थ होतो.

यावेळी सोनालीने मोनाकिनीमधील फोटोशूट केले आहे. त्यात ती छान पूलमधील झोपाळ्यावर बसल्याचे दिसत आहे.

तर एका फोटोत ती छान हॅट घालून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.

तसेच ते दोघेही बाल्कनीत छान ब्रेकफास्ट करतानाच एक फोटोही तिने शेअर केला आहे.

सोनालीने हे फोटो शेअर करताना #honeymoondiaries #cancun #mexico #sonaleekulkarni #kenosona #3rdhoneymoon असे हॅशटॅग वापरले आहेत.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता.

त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते.

आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ते दोघेही पुन्हा विवाहबंधनात अडकले.

काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.