
मागील काही काळात बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांचे चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. मात्र दुसरीकडे साउथ इंडस्ट्रीतील चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. आता बॉलीवूडमधील असे काही मोठे स्टार्स आहेत ज्यांच्या येणाऱ्या चित्रपटांवर चाहत्यांची नजर आहे आणि त्या चित्रपटांकडून चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा देखील आहे. (सर्व छायाचित्रे: सोशल मीडिया)

कंगना राणौतच्या ‘धाकड’ या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौतचा हा चित्रपट चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये कंगना जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.

अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट काही विशेष कमला करू शकला नाही. पण आता त्याचा पृथ्वीराज हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट देखील ३०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचीही चाहते वाट पाहत आहेत. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता आमिर खानकडूनही इंडस्ट्रीला खूप आशा आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनत आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती आणि आता तो सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट खूपच वेगळा असणार असल्याचे बोलले जात आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट हृतिकचा लूक समोर आल्यापासून चर्चेत आहे. हा चित्रपट साऊथच्या विक्रम वेधाचा रिमेक असला तरी चाहत्यांना या चित्रपटाकडूनही खूप आशा आहेत. हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

यामध्ये एक नाव शाहरुख खानचे देखील आहे. झिरो चित्रपट फ्लॉप झाल्यापासून शाहरुख कोणत्याही चित्रपटात दिसला नाही, मात्र आता येत्या जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या पठाण या चित्रपटात तो दिसणार आहे.

सलमान खानच्या टायगर-3 कडूनही प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतील लोकांना खूप अपेक्षा आहेत. मात्र, सलमान खानचे शेवटचे दोन चित्रपट राधे आणि अंतिम हे कमाल करू शकले नाहीत. टायगर-3 पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे