
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून तापसी पन्नूला ओळखले जाते.

गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. ती तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं काही बोलत नाही.

भारतीय बॅडमिंटनपटूंनी रविवारी इतिहास रचत थॉमस चषक स्पर्धेत विजय मिळवला. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली.

या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले. यानंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन प्रशिक्षक माजी डॅनिश बॅडमिंटनपटू मॅथिअस बोई (Mathias Boe) हा चर्चेत आला.

मॅथिअस बोई हा अभिनेत्री तापसी पन्नूचा प्रियकर आहे. या ऐतिहासिक विजयानंतर तापसी पन्नूने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती.

सध्या मॅथिअस हा यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अनेकजण त्याच्याबद्दल विविध गोष्टी सर्च करु लागले आहेत.

मॅथिअस हा एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे. त्याने डेन्मार्ककडून खेळताना अनेक पदकेही मिळवली आहेत.

मॅथिअसचा जन्म ११ जुलै १९८० रोजी डेन्मार्कमधील फ्रेड्रिक्संड येथे झाला.

त्याने २०१२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

यानंतर २०१५ साली युरोपियन गेम्समध्येही सुवर्णपदक मिळाले आहे.

मॅथिअसने एप्रिल २०२० मध्ये बॅडमिंटनपटू म्हणून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूंच्या विनंतीवरुन मॅथिअसला प्रशिक्षक बनवण्यात आले.

तापसी पन्नू आणि मॅथिअस गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

२०१३ मध्ये एका भारतीय बॅडमिंटन लीगदरम्यान त्यांची भेट झाली होती.

त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

त्या दोघांच्या कुटुंबियांनाही तापसी आणि मॅथिअसच्या रिलेशनशिपबाबतची माहिती आहे. मॅथिअसच्या पालकांनाही तापसी खूप आवडते.

मॅथिअस हा अनेकदा तापसीला भेटण्यासाठी मुंबईत येत असतो.

तसेच तापसीही तिच्या कामात व्यस्त असली तरी त्याला भेटण्यासाठी वेळ काढत असते.

गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले तापसी आणि मॅथिअस हे विवाहबंधनात कधी अडकणार? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र अद्याप याबाबतचा खुलासा झाला नाही.