-
अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही गेली अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीपासून दूर होती.
-
तर ‘वेड’ या चित्रपटातून तिने मनोरंजसृष्टीत जवळपास १० वर्षांनी पुनरागमन केलं. या चित्रपटातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला.
-
या चित्रपटात तिने श्रावणी ही व्यक्तिरेखा साकारली. या तिच्या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम होतं, किंबहुना आजही करत आहेत.
-
परंतु या चित्रपटात काम करण्यापूर्वी जिनिलीयाला दडपण आलं होतं असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला.
-
तिच्या पुनरागमनाबाबत तिच्या मनात अनेक शंका होत्या. प्रेक्षक तिला पुन्हा स्क्रिनवर पाहू इच्छित आहेत की नाही असे अनेक प्रश्न तिला पडले होते.
-
या सर्व प्रश्नांमुळे तिला तिच्या पुनरागमन करताना दडपण आलं होतं.
-
पण कमबॅक आधीच्या मधल्या काळात आपण कशा प्रकारच्या भूमिका साकारायला हव्या हेही तिला कळलं असल्याचं तिने सांगितलं.

Video: सिद्धार्थ-कियाराने लग्नानंतर वाटली मिठाई; अभिनेत्रीच्या साध्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष