-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील कलाकारांची नेहमीच चर्चा रंगताना दिसते.
-
मध्यंतरी वनिता खरातच्या विवाहसोहळ्यातील अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले.
-
त्यामध्येच प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
-
प्रियदर्शनीने ओंकार राऊतबरोबरच एक फोटो शेअर केला होता.
-
यात ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना दिसत होती.
-
तर दुसरीकडे ओंकारही तिच्याकडे पाहत होता. तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळने कमेंट केली होती.
-
‘ज्या पद्धतीने ओंकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो’ अशी कमेंट आस्तादने केली.
-
त्यानंतर ओंकार व प्रियदर्शनीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.
-
या दोघांनीही या चर्चांवर मौन कायम राखलं. आता प्रियदर्शनीने स्वतःच ओंकार व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे.
-
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियदर्शनीला ओंकारबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं.
-
तेव्हा प्रियदर्शनी म्हणाली, “माझा पहिलाच चित्रपट (ती फुलराणी) येत आहे. इतक्या लवकर माझ्याबाबतीत कॉन्ट्रोवर्सी कशी काय घडली?”
-
“आस्ताद काळेने आमच्या दोघांच्या फोटोंवर एक कमेंट केली. त्यावर मी गंमतीशीर रिप्लाय केला”.
-
“पण त्या एका गोष्टीमुळे एवढी चर्चा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण असं काहीही नाही. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत”.
-
“काम करताना मैत्री वाढत जाते. हे इतकंच आहे. लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसत आहे. हे म्हणजे लोकांचंच आमच्यावर असलेलं प्रेम आहे. आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे”.
-
प्रियदर्शनीच्या प्रतिक्रियेनंतर ओंकार व तिच्या अफेअरच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. (सर्व फोटो – फेसबुक)
