-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारही खूपच लोकप्रिय झाले आहेत.
-
या कार्यक्रमाची गेले काही महिने सातत्याने चर्चा होत आहे ती ओंकार भोजनेमुळे.
-
त्याने या शोला रामराम केला आणि त्याची नेमकी कारणं कोणती, याबद्दल चर्चा रंगली.
-
अशातच वनिता खरातने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
“शो सोडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, वैयक्तिक मत आहे, असं मला वाटतं. त्यामुळे त्याबद्दल बोलणारे आपण कोणीच नाही. त्यांना वेगळं काम मिळालं असेल आणि त्यामळे त्यांनी निर्णय घेतला असेल,” असं ती म्हणाली.
-
“याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या निर्णयावर त्यांना ट्रोल करणं चुकीचं आहे. आपण चर्चा करत राहणं चुकीचं आहे. प्रत्येकाची त्यांच्या निर्णयामागची कारणं वेगळी असतात,” असं वनिता खरात ‘सकाळ’च्या पॉडकास्टमध्ये म्हणाली.
-
वनिता व ओंकार दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक स्किटही एकत्र केले होते.
-
ओंकार वनिताच्या लग्नानंतर घरी भेटायला आला होता, त्याचा एक मजेशीर व्हिडीओही व्हायरल झाला होता.
-
दरम्यान, ओंकारने शो सोडल्यानंतर त्याची आठवण येते का, असा प्रश्न वनिताला विचारण्यात आला.
-
“मी, ओंकार आणि गौरवने खूप स्किट एकत्र केले आहेत. तो माझा खूप चांगला मित्र आहे.”
-
“आता तो जे करतोय तेही उत्तम आहे. आम्ही पुढे कधीतरी एकत्र काम करू, पण आमची मैत्री कधीच तुटणार नाही,” असं ती म्हणाली.
-
सेच ओंकारने शो सोडण्याचा निर्णय घेतल्यावर आपल्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याला मिठी मारून रडल्याचा खुलासाही वनिताने केला.
-
“त्याला नको जाऊस असं म्हटलं होतं, पण तो त्याचा निर्णय होता, त्यात चुकीचं काही नाही. पण तो गेला तेव्हा मी त्याला मिठी मारून खूप रडले होते,” असं वनिता म्हणाली.
-
वनिता, गौरव व ओंकार यांनी एकत्र अनेक स्किट करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं.
-
(फोटो – इन्स्टाग्राम व संग्रहित)
ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर ढसाढसा रडलेली वनिता खरात; म्हणाली, “तो गेला तेव्हा…”
ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यावर वनिता खरातची प्रतिक्रिया
Web Title: Vanita kharat cried badly after onkar bhojane left maharashtrachi hasya jatra hrc