-
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा आता लवकरच पार पडणार आहे.
-
सध्या या दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
-
क्षितिजाने तिच्या मेहंदी सोहळ्याची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
मेहंदीसाठी क्षितिजाने खास तयारी केली होती.
-
हिरव्या रंगाचा खणाचा ड्रेस, ‘प्रथमेशची पराजू’ असं हटके नाव लिहिलेले कानातले असा खास लूक क्षितिजाने केला होता.
-
यावेळी तिच्या हातावरच्या आकर्षक मेहंदीने विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
क्षितिजाच्या हातावरच्या मेहंदीवर ‘प्रतिजा’ ( प्रथमेश व क्षितिजा #Pratija ) हा खास हॅशटॅग लिहिण्यात आला आहे.
-
होणाऱ्या लाडक्या बायकोला मेहंदी काढत असताना प्रथमेशने खास व्हिडीओ कॉल केला होता.
-
आता लवकरच प्रेक्षकांची ही आवडती जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम व @lenswomania )

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल