-
संजय लीला भन्साळी यांची आगामी ओटीटी मालिका ‘हिरामंडी: द डायमंड बझार’ ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या मालिकेत अनेक स्टार्स बऱ्याच काळानंतर पडद्यावर परतताना दिसणार आहेत. ही संजय लीला भन्साळीची ओटीटी पदार्पणाची पहिली मालिका आहे. (@BhansaliProductions/FB)
-
मीडिया रिपोर्ट्नुसार सोनाक्षी सिन्हाने या मालिकेसाठी सर्वात जास्त रक्कम घेतली आहे. अभिनेत्रीने मालिकेसाठी २ कोटी रुपये घेतले आहेत. मालिकेमध्ये सोनाक्षी फरीदान या भूमिकेत दिसणार आहे.
-
आदिती राव हैदरी या मालिकेत बिब्बोजनच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,अभिनेत्रीने १ ते १.५ कोटी रुपये घेतले.
-
मनीषा कोईराला देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मालिकेमध्ये मनीषा कोईराला मल्लिका जानची भूमिका साकारत आहे. अभिनेत्रीला या भूमिकेसाठी १ कोटी रुपये मिळाले आहेत.
-
हीरामंडीमध्ये लांजोची भूमिका साकारणाऱ्या रिचा चड्ढालाही १ कोटी रुपये मिळाले आहेत.
-
या मालिकेत वहिदाची भूमिका करणाऱ्या संजीदा शेखला ४० लाख रुपये मिळाले आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान बऱ्याच काळानंतरया मालिकेद्वारे अभिनय करताना दिसणार आहे. वली मोहम्मदची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याला सुमारे ७५ लाख रुपये मानधन मिळाले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्मीन सहगलला तिच्या भूमिकेसाठी ३५ लाख रुपये मिळाले आहेत.

न्या.गवईंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले मोठे पाऊल….