-
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मोठी नावं सध्या हिंदी मनोरंजन विश्वात लोकप्रिय होत असल्याचं पाहायला मिळतंय.
-
हेमंगी कवी, अभिज्ञा भावे, गौरव मोरे, अमृता खानविलकर, गश्मिर महाजनी, मयूरी देशमुख यांसारखे अनेक कलाकार हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका साकारत आहेत.
-
याच नावांबरोबरच आता आणखी एक मराठमोळं नाव जोडलं जाणार आहे. हिंदी मालिका विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने कंबर कसली आहे.
-
मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकल्यानंतर आता ऋतुजा लवकरच हिंदी मालिकेत दिसणार आहे.
-
२७ मे पासून सुरू होणाऱ्या ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत ऋतुजा प्रमुख भुमिकेत असणार असून ‘बिगबॉस १६’ फेम अंकित गुप्ता तिच्यासह प्रमुख भुमिकेत असेल. त्याच्या पात्राचं नाव ‘रणविजय’ असं असेल.
-
दिग्दर्शक, कथा आणि भूमिका या सगळ्याचा विचार करून मी ही मालिका स्वीकारली असं ऋतुजा बागवेने एका मुलाखतीत सांगितलं.
-
‘माटी से बंधी डोर’ या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मुडे करत आहेत. ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक असणार आहे. ऋतुजाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
-
याच दरम्यान ऋतुजाने सोशल मीडियावर नवे फोटो पोस्ट करत तिच्या पात्राची झलक दाखवली आहे.
-
ऋतुजाने पोस्ट केलेल्या फोटोनुसार ती ग्रामीण मुलीचे पात्र साकारणार असून तिचे नाव ‘वैजू’ असे असेल.
-
तथापि, चाहत्यांनी ऋतुजाचे कौतुक केलं असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
![Sunil Gavaskar criticised ICC After IND vs CAN Got Cancelled due to rain](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/New-Project-2024-06-16T002552.347.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”