Sunil Gavaskar Angry on ICC After IND vs Can Cancelled Due to Rain: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चे प्रथमच अमेरिकेत आयोजन करण्यात आले. अमेरिका देशात क्रिकेटच्या प्रसारासाठी हा विश्वचषक अमेरिकेत आयोजित करण्यात आला. वर्ल्डकप सामने खेळले जावे यासाठी आयसीसीने अनेक प्रयत्नही केले, पण खेळताना काही गैरसोयींचा संघांना सामना करावा लागला. फ्लोरिडामधील भारत वि कॅनडा सामना रद्द झाल्याने भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर आयसीसीवर चांगलेच भडकले आहेत.

अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकातील सामन्यातील बहुतेक सामने पावसामुळे अडचणीत आले आहेत. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे पावसामुळे लागोपाठ दोन सामने रद्द झाले. त्यामुळे पाकिस्तानसारखा बलाढ्य संघ सुपर८ च्या शर्यतीतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत आता भारताच्या माजी क्रिकेटपटूनेही आयसीसीला फटकारले आहे. अमेरिकेतील सुविधा पाहून कॉमेंट्री करताना गावसकर भडकले.

Fox Vitality T20 Blast Viral Video
T20 Blast 2024 : लाइव्ह मॅचमध्ये कोल्हा मैदानात घुसल्याने खेळाडूंची उडाली तारांबळ, VIDEO व्हायरल
India vs Zimbabwe 2nd T20I Updates Cricket Score in Marathi
IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा
Virat kohli going to London video viral
१६ तासांचा प्रवास, दिवसभर सेलिब्रेशन अन् विराट पुन्हा लंडनला रवाना, जाणून घ्या काय आहे कारण? VIDEO व्हायरल
Kuldeep Yadav
IPL मधील ‘त्या’ सामन्यानंतर ढसाढसा रडणारा, आतून कोलमडलेल्या कुल’दीप’ने कसं केलं पुनरागमन?
Irfan Pathan emotional after Team India's win
IND vs SA : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर इरफान पठाण भावुक, रडत रडत सूर्याचे मानले आभार, VIDEO व्हायरल
Reserve day for India vs South Africa final
IND vs SA : फायनल आणि राखीव दिवशीही पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार जेतेपदाचा करंडक?
T20 World Cup 2024 India vs England Semi Final 2 Match Preview in Marathi
IND vs ENG Semi Final 2 : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला होणार फायदा?
What if IND v ENG Gets Washed Out due to rain
T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम

हेही वाचा – IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण

स्टार स्पोर्ट्स कॉमेंट्री पॅनलचे सदस्य असलेले सुनील गावस्कर यांनी फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर निराशा व्यक्त केली आहे. गावसकर म्हणाले, “आयसीसीने अशा ठिकाणी सामने आयोजित करू नये जिथे संपूर्ण मैदान पावसापासून सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था नाही. फक्त खेळपट्टी कव्हर्सने झाकली आणि उर्वरित मैदान पावसाच्या पाण्याने ओलं होतंय तुम्ही असे करू शकत नाही.”

हेही वाचा – गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

पावसामुळे सामना रद्द झाल्याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही वैतागला. मायकेल वॉन यांनी ट्विट केले, ‘संपूर्ण मैदान कव्हर करण्यासाठी अधिक कव्हर्स कसे नाहीत हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. सामन्यांमध्ये सगळा पैसा गुंतवला आहे आणि तरीही ओल्या आउटफिल्डमुळे सामने रद्द करण्यात येत आहेत.’ हे फक्त अमेरिकेतच नाही तर वेस्ट इंडिजमध्येही आहे. विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे यंदाच्या टी-२० विश्वचषकाचे आयोजक आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024: “शाहीन नाराज, रिजवानला हवे होते कर्णधारपद” पाकिस्तान संघात दुफळी

पावसामुळे इंग्लंड संघाला चांगलाच फटका बसला. त्यांचा स्कॉटलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळेच रद्द झाला. याच कारणामुळे गतविजेत्या इंग्लंडला आता सुपर८ मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. अँटिगामध्ये होणाऱ्या नामिबियाविरुद्धच्या करो या मरो सामन्यालाही पावसाचा फटका बसला आहे.