-
भारतीय अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे.
-
कोलकाता येथे राहणाऱ्या या अभिनेत्रीला ‘द शेमलेस’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये तिने एका सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे, जी एका पोलिसाला चाकू मारून पळून जाते.
-
‘द शेमलेस’ हा चित्रपट बल्गेरियन चित्रपट निर्माता कॉन्स्टँटिन बोजानोव्ह यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘द कोलकाता’ला दिलेल्या मुलाखतीत अनसूयाने सांगितले की, जेव्हा तिला कान्सच्या यूएन सरटेन रिगार्ड विभागात तिच्या चित्रपटाचे नामांकन झाल्याची माहिती मिळाली तेव्हा तिने आनंदाने खुर्चीवरून उडी मारली होती.
-
अनसूयाला ‘द शेमलेस’ हा चित्रपट कसा मिळाला याबद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अनसूयाला चित्रपटात काम करण्यासाठी फेसबुकद्वारे आमंत्रित केले.
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जून २०२० मध्ये कॉन्स्टँटिनने मला मेसेज केला आणि त्यांना मला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे आहे.” आणि माझी पहिली प्रतिक्रिया होती की ‘मी का?’ त्यावर अभिनेत्रीने सांगितले की तिची ऑडिशन टेप पाहून बोजानोव्ह खूप प्रभावित झाले होते आणि म्हणून पहिल्यांदाच ते मला हो म्हणाले.
-
अनसूयाने २००९ मध्ये बंगाली दिग्दर्शक अंजन दत्त यांच्या ‘मॅडली बंगाली’ या रॉक म्युझिकल फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. २०१३ मध्ये मुंबईत येण्यापूर्वी अभिनेत्रीने काही काळ थिएटरमध्ये देखील काम केले.
-
मात्र, अभिनयासाठी मुंबईत आल्यानंतर अनसूयाला अभिनयाच्या फारशा ऑफर्स मिळाल्या नाहीत म्हणून त्यानंतर अनसूयाने चित्रपटांच्या कला विभागात काम करण्यास सुरुवात केली. ति प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम करू लागली.
-
अभिनेत्रीने संजीव शर्माच्या ‘सात उचक्के’, सृजित मुखर्जीच्या ‘फोरगेट मी नॉट’ आणि नेटफ्लिक्सच्या ‘एंथॉलॉजी रे’मध्ये प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केले आहे.
-
याशिवाय अनसूयाने अभिनेत्री नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता यांच्या नेटफ्लिक्स शो ‘मसाबा-मसाबा’चा सेट देखील तयार केला होता.
-
अनसूयाला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली नसती तर तिचे पत्रकार होण्याचे स्वप्न होते.
(फोटो क्रेडिट: @cup_o_t/instagram)
![Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Saurabh_Netra-2.jpg?w=300&h=200&crop=1)
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”