-
मनोरंजन जगतात कान्स चित्रपट महोत्सवाला महत्वाचे मानले जाते. यंदा हा महोत्सव १३ मे ते २४ मे या दिवशी आयोजित करण्यात आला होता.
-
या महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.
-
त्यांनी इन्स्टाग्रामवरून तेथिल फोटो शेअर केले आहेत.
-
अमृता फडणवीसांनी कान्समध्ये हा लूक केला होता.
-
यावेळी आयोजित संवाद सत्रातही त्यांनी त्यांचे मत मांडले.
-
‘महिलांची समानता’ या विषयावर हे चर्चासत्र होतं. बेटर वर्ल्ड आणि युनेस्को या संस्थांनी ते आयोजित केलं होतं.
-
यावेळी अमृता फडणवीसांनी एक सामाजिक जबाबदारीही स्वीकारली आहे. त्या ‘Ambassador for womens rights ‘ म्हणूनही काम पाहणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी फोटो कॅप्शनमधून दिली आहे.
-
अमृता फडणवीस नेहमी विविध कारणाने चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्यांची अनेक गाणीही प्रदर्शित होतात.
-
(सर्व फोटो साभार- अमृता फडणवीस इन्स्टाग्राम) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case