-
आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागलाच असेल. अधूनमधून होणारी डोकेदुखी सामान्य आहे. मात्र तणाव, मायग्रेन, औषधांचे अतिसेवन, सायनस, थंडी, मेंदू कमकुवत होणे इत्यादी कारणांमुळे अनेकदा गंभीर डोकेदुखीची तक्रार जाणवू शकते.
-
उच्च रक्तदाब, ब्रेन इन्फेक्शन, ब्रेक ट्युमर आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे ही डोकेदुखीची काही गंभीर कारणे आहेत.
-
कधीकधी हवामानातील बदल, तीव्र वास, परफ्यूम, तीव्र प्रकाश आणि मासिक पाळी यामुळेही डोकेदुखीची समस्या वाढते. मात्र, काही लोकांना काही पदार्थ खाल्ल्यानेही डोकेदुखीचा त्रास होतो.
-
काही पदार्थांचे सेवन केल्याने मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. मिठाई किंवा कार्बोहायड्रेट्सचे सेवन केल्यानेही काहींना डोकेदुखीचा खूप त्रास होतो.
-
तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही काही पदार्थांपासून अंतर राखणे गरजेचे आहे.
-
तज्ज्ञांकडून जाणून घेऊया, असे कोणते पदार्थ आहेत जे तीव्र डोकेदुखी आणि मायग्रेन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
-
रेड वाईनचे सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या मते, रेड वाईन प्यायल्यानंतर डोकेदुखी होणे खूप सामान्य आहे.
-
संशोधनानुसार, रेड वाईनमध्ये वापरल्या जाणार्या द्राक्षांमध्ये असलेले हिस्टामाइन कंपाऊंड डोकेदुखी वाढवण्यासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. ज्या लोकांना डोकेदुखीची समस्या आहे त्यांनी द्राक्षे खाणे टाळावे.
-
काही लोकांना चीज खायला आवडते, पण ते खाल्ल्यानंतर मायग्रेनची समस्या वाढते. ज्यांना मायग्रेनची समस्या आहे त्यांनी चीज खाणे टाळावे.
-
चॉकलेट खाणे सर्वांनाच आवडते. चॉकलेट खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास वाढतो. चॉकलेटमध्ये कॅफिन आणि टायरामाइन आढळतात ज्यामुळे डोकेदुखी होते. ज्या लोकांना डोकेदुखीची समस्या आहे त्यांनी चॉकलेटचे सेवन टाळावे.
-
आयुर्वेदानुसार जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दुधाचे सेवन करू नये. दुधाचे सेवन केल्याने गॅसची समस्या उद्भवू शकते आणि यामुळे डोकेदुखी वाढू शकते. म्हणूनच डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी दुधाचे सेवन टाळावे. (सर्व फोटो : Freepik)
-
हेही पाहा : हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे

Women U19 WC: भारताच्या लेकी बनल्या करोडपती! पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच BCCI सचिव जय शाहांची मोठी घोषणा