-
बदललेल्या जीवनशैलीचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. खाण्याच्या चुकीच्या सवयी, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, कामाचा ताण यात स्वतःबरोबर मुलांच्या तब्बेतीचीही हेळसांड होते. त्यामुळे पालकांना सतत मुलांच्या तब्बेतीची चिंता सतावत असते.
-
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे ते पटकन कोणत्याही आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे सर्व पालक लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. यासह मुलांना सुदृढ आणि निरोगी बनवण्याकडेही पालकांचा कल असतो.
-
सकाळच्या काही सवयी मुलांना सुदृढ आणि निरोगी बनवण्यासाठी मदत करतात. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.
-
मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावा: अनेक लहान मुलांना सकाळी उशीरा उठण्याची सवय असते, यामुळे दिवसभार आळस जाणवू शकतो.
-
याउलट जर मुलं सकाळी लवकर उठली तर दिवसभरातील कामं करण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळेल, तसेच त्यांना दिवसभर ताजेतवाणे वाटेल. सकाळी लवकर उठणे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
-
सकाळी उठल्यानंतर मुलांना पाणी पिण्याची सवय लावा: बऱ्याच लहान मुलांना पाणी पिण्याचा अतिशय कंटाळा येतो किंवा आवडत नाही. यामुळे त्यांना पोटदुखी, अपचन अशा समस्यांचा त्रास होतो.
-
यासाठी लहान मुलांना सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावा, यामुळे पोट स्वच्छ होण्यास आणि पोटाच्या विकारांपासून लांब राहण्यास मदत मिळते.
-
व्यायाम: लहान मुलांना सकाळी नियमितपणे व्यायाम करण्यावची सवय लावा.
-
तुम्ही मुलांना प्राणायम, योगा असे सोपे व्यायाम आणि मेडिटेशन शिकवू शकता. यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होईल.
-
दिवसभरातील कामाची यादी करायला शिकवा: दिवसभरात कोणती कामं करायची आहेत त्याची यादी तयार करून त्यानुसार काम करायला शिकवा, यामुळे मुलांना प्रत्येक कामावर लक्ष केंद्रित करण्याची सवय लागेल.
-
नाश्त्यामध्ये सकस आहाराचा समावेश: लहान मुलांना जंक फूड, तळलेले पदार्थ खूप आवडतात. पण अशा पदार्थांमुळे त्यांची तब्बेत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यामध्ये योग्य, सकस आहाराचा समावेश करा. यामुळे मुलांना ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

Video : वनिता खरातच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, डिझाईनची सोशल मीडियावर चर्चा