-
हृदय आणि मेंदू हे आपल्या शरीराचे असे दोन अवयव आहेत, ज्यांचे योग्य आणि नियमित कार्य करत राहणे आपल्या जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. श्वास घेण्यासाठी आणि योग्य पद्धतीने जीवन जगण्यासाठी हृदय आणि मेंदू यांचे कार्य आणि त्यांच्यातील समतोल गरजेचा आहे.
-
हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी हृदय आणि निरोगी मेंदूसाठी योग्य आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. निरोगी आहारामध्ये निरोगी फॅट्स आणि सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो. मासे हे चरबी नसलेले अन्न आहे जे मेंदू आणि हृदय यांच्या आरोग्यासाठी एक विशेष उपाय आहे.
-
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की माशांचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे आजार दूर राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा मासे खाल्ल्याने स्ट्रोकसारख्या आजारांपासून बचाव होतो.
-
अभ्यासानुसार, अमेरिकेत दर पाचपैकी एक मृत्यू मेंदूतील रक्ताच्या कमतरतेमुळे होतो. कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ. व्हीके मिश्रा यांच्या मते, मासे मेंदूसाठी पूरक अन्न आहे. आज आपण, मासे हे मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम अन्न कसे आहे हे जाणून घेऊया.
-
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील अवयवांमध्ये घट होत असते, परंतु वैद्यकीय शास्त्रानुसार आहाराची काळजी घेतल्यास वृद्धापकाळातही हृदय आणि मेंदू निरोगी ठेवता येते.
-
तज्ज्ञांच्या मते, मासे हे असे अन्न आहे जे मेंदूला तीक्ष्ण ठेवते आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे मेंदूची शक्ती, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी संजीवनीप्रमाणे काम करतात.
-
मासे खाल्ल्याने स्मृतिभ्रंश आणि स्ट्रोक यांसारख्या मेंदूच्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. नियमित मासे खाल्ल्याने वृद्धत्वामुळे होणारे मानसिक आजार कमी होऊ शकते. ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध मासे खाल्ल्याने हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतात.
-
अभ्यासानुसार, जे लोक आठवड्यातून दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा मासे खातात, त्यांना मेंदूचे विकार होण्याचा धोका कमी होता.
-
फ्रान्समधील बोर्डो विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. सेसिलिया समेरी यांनी सांगितले की त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष अतिशय प्रभावी आहेत. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी मासे हे सर्वोत्तम अन्न असल्याचे त्यांनी सांगितले. (Freepik)
मेंदू आणि हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी मांसाहार महत्त्वाचा! तज्ज्ञानी सांगितलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
मांसाहार करणे मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम कसे आहे, हे जाणून घेऊया.
Web Title: Non veg is important for good brain and heart health you will be amazed to read the benefits told by the experts pvp