-
आपल्यापैकी अनेकजणांना घर स्वच्छ ठेवायला आवडते. झाडू लावणे, फरशी पुसणे, किचन स्वच्छ ठेवणे, इत्यादी. आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा भाग आहे. (Photo : Pexels)
-
इतर गोष्टींच्या तुलनेत आपण बाथरुम मात्र दररोज नाही तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वच्छ करतो त्यामुळे अनेकदा बाथरुमच्या टाइल्सवर पिवळटपणा दिसून येतो पण हेल्दी लाइफस्टाइलसाठी बाथरुमची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे.(Photo : Pexels)
-
आज आम्ही तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये बाथरुमचा पिवळटपणा कसा दूर करायचा याविषयी सांगणार आहोत. (Photo : Pexels)
-
बाथरुमच्या टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणताही दहा रुपयांचा साधारण साबण विकत आणा. या साबणाचे बारीक बारीक तुकडे करावेत. (Photo : Pexels)
-
हे तुकडे एका बॉटलमध्ये पाणी टाकून मिक्स करावे. जेव्हा साबणाचे तुकडे पाण्यात विरघळेल तेव्हा हे साबणाचे लिक्विट टाइल्सवर टाकावे आणि स्क्रबरनी चांगल्याने घासावे. या सोपी उपायाने टाइल्सचा पिवळटपणा दूर होणार. (Photo : Pexels)
-
टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दहा रुपयाच्या व्हिनेगरचाही वापर करू शकता. यासाठी व्हिनेगरला गरम पाण्यात मिक्स करावे. (Photo : Pexels)
-
हे पाणी टाइल्सवर टाकून स्क्रबनी घासावे. ही ट्रिक वापरल्याने टाइल्स नव्यासारखी दिसेल. (Photo : Pexels)
-
जर टाइल्सवर खूप जास्त चिकटपणा किंवा अस्वच्छता असेल तर मीठाचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. बाथरुम स्वच्छ करण्याच्या आदल्या रात्री बाथरुमध्ये मीठ टाकावे आणि रात्रभर ठेवावे. (Photo : Pexels)
-
दुसऱ्या दिवशी सकाळी स्क्रबरनी टाइल्स चांगल्या घासाव्यात. या बेस्ट ट्रिकने टाइल्सचा पिवळटपणा दूर होणार. (Photo : Pexels)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”