अमेरिकी काँग्रेसमधील मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- 1 / 8
आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य, लोकशाही आणि समतेची बिजे रुजवून भारत घडविला आहे. भारत एकदिलाने नांदत आहे, एकदिलाने विकास साधत आहे आणि एकदिलाने आनंद साजरा करीत आहे. (Source: Twitter/@MEAIndia)
- 2 / 8
वसुधैव कुटुम्बकम ही आमची प्राचीन धारणा असल्याने जागतिक शांती आणि विकासासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत. (Source: Twitter/@MEAIndia)
- 3 / 8
जगात हा दहशतवाद विविध रूपे घेऊन वावरत असला तरी द्वेष, हत्या आणि हिंसा हीच त्याची समान तत्त्वे आहेत. जे राजकीय लाभासाठी दहशवादाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत त्यांना अमेरिकन काँग्रेसने नेहमीच स्पष्ट इशारा दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. (Source: Twitter/@MEAIndia)n
- 4 / 8
दहशतवाद हीच जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. या दहशतवादाला आमच्या शेजाऱ्यांनी खतपाणी घातले असले तरी आज त्याची सावली जगभर पसरत आहे. कोणताही भेदाभेद न करता , दहशतवाद पोसणाऱ्यांना एकाकी पाडले पाहिजे. (Source: Twitter/@MEAIndia)
- 5 / 8
अमेरिका हे लोकशाहीचे मंदिर असून त्याने जगभरातील अन्य लोकशाही देशांना प्रोत्साहन आणि बळ दिले आहे. (Source: Twitter/@MEAIndia)
- 6 / 8
अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा, सर्व लोक समान आहेत, हा मंत्र अमेरिकेच्या धमन्यांतून वाहात आहे. अमेरिका ही स्वातंत्र्याची आणि शौर्याची भूमी आहे. (Source: Twitter/@MEAIndia)
- 7 / 8
मी अमेरिकेचे २५ प्रांत फिरलो. त्यातून मला जाणवले की देशाचे खरे सामथ्र्य देशवासियांच्या स्वप्नांत असते. (Source: PIB)
- 8 / 8
अमेरिकेच्या राज्यघटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही अमीट प्रभाव पडला होता. शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाचाही मोदी यांनी उल्लेख केला. (Source: PIB)