-
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत विजय चौक येथे लेजर शो आणि ड्रोनचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे.
-
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बिटिंग रिट्रिट समारंभात लेजर शोचा समावेश करण्यात आलाय.
-
हा समारंभ २९ जानेवारीला दिल्लीतील विजय चौकात होईल. यासाठी १००० मेड इन इंडिया ड्रोनचा वापर करण्यात आलाय.
-
बिटिंग रिट्रिट समारंभात १९५० पासून वाजवण्यात येणारी अबाईड विथ मी ही धून यंदा वाजवली जाणार नाहीये.
-
‘अबाईड विथ मी’ऐवजी कवी प्रदीप यांच्या ‘ये मेरे वतन के लोगो’ची धून वाजवली जाणार आहे.
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेट येथे २३ जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचं उद्घाटन केलंय.

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल