
मुसळधार बर्फवृष्टीमुळे जवळपास दोन महिने बंद राहिल्यानंतर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा श्रीनगर-लेह महामार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) सातत्याने प्रयत्नांनंतर हा महामार्ग काही आठवड्यांसाठी या वर्षी बंद ठेवण्यात आला होता

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी म्हणाले की, खराब हवामान असूनही विक्रमी वेळ खुला राहिल्यानंतर जोरदार बर्फवृष्टीनंतर रस्ता यावर्षी ५ जानेवारी रोजी बंद करण्यात आला होता.

७३ दिवसांनंतर रस्ता पुन्हा उघडण्यात आल्याने हा एक विक्रम आहे. पूर्वी लडाखपासून सहा महिने संपर्क तुटलेला असायचा. पण गेल्या वर्षी आम्ही ते ११० दिवसात करुन दाखवले होते.

जोजिला हा एक उंच पर्वतीय खिंड आहे जो काश्मीर खोऱ्यापासून लडाखपर्यंत जातो आणि समुद्रसपाटीपासून ३५२८ मीटर उंचीवर आहे. (फोटो सौजन्य- PTI)

हा रस्ता लडाखच्या लोकांसाठी तसेच सुरक्षा दलांसाठी महत्त्वाचा आहे. (फोटो सौजन्य- PTI)

वाहतूक पुन्हा सुरू केल्याने राज्याच्या इतर भागांपासून तुटलेल्या लेह आणि कारगिलमधील लोकांना दिलासा मिळाला आहे. (फोटो सौजन्य- PTI)

लेह श्रीनगरपासून ४३४ किमी अंतरावर आहे. मात्र सोनमर्ग ते द्रास या ६३ किमीच्या पट्ट्यात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे सैनिक या त्रासाला दूर करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात. (फोटो सौजन्य- PTI)

भयंकर थंडी, तापमान शून्याखाली असतानाही बीआरओचे बीकन आणि प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत काम करणारे जवान महामार्ग वाहतुकीस योग्य बनवतात. (फोटो सौजन्य- PTI)