-
करोनामुळे बंद असलेले दिल्लीतील मादाम तुसाद संग्राहलय १९ जुलै रोजी पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले होते. आता नोएडामध्ये याची एक शाखा उघडण्यात आली आहे. येथील नवीन म्युझियममध्ये जवळपास ५० सेलिब्रेटींच्या मेणाचे पुतळे तयार करण्यात आले आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
डीएलएफ मॉल येथे नव्याने उघडलेल्या संग्रहालयात राजकीय नेते, खेळाडू, संगीतकार, चित्रपट कलाकार आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व आदींचे मेणाचे पुतळे बसवण्यात आले आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
या संग्रहालायात, मिल्खा सिंग सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि विराट कोहली यांसारखे मोठ्या खेळाडूंचेही पुतळे बसवण्यात आले आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
या संग्राहलयात अभिनेत्री मधुबाला यांचादेखील मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. ( फोटो स्टेला निशा गोगोई )
-
द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मादाम तुसादचे सीईओ अंशुल जैन म्हणाले, “दरवर्षी लाखो लोक मादाम तुसादच्या पोर्टलला भेट देतात. आतापर्यंत लोक मेणाचे पुतळे पाहण्यासाठी वाट पाहत होते. हे केवळ एक संग्रहालय नाही तर ते तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी एक खास अनुभव आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, सुभाष चंदा बोस यांसारखे भारतातील महान स्वातंत्र्यसैनिक, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी यांचे पुतळेदेखील येथे तयार करण्यात आले आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
प्रत्येक मेणाचा पुतळा २० हून अधिक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी ३ ते ६ महिने एकाच वेळी काम करून तयार केला आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
सर्व मेणाचे पुतळे विनाइल फ्लोअरिंगवर एकत्र ठेवले आहेत. त्यामुळे येथे आल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ( स्टेला निशा गोगोई फोटो )
-
अभिनेता रणबीर कपूरचा मेणाचा पुतळा देखील येते तयार करण्यात आला आहे. ( फोटो अभिनव साहा )
-
यासोबतच भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचेही मेणाचे पुतळे येथे तयार करण्यात आले आहेत. ( फोटो अभिनव साहा )
-
अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळाही येथे तयार करण्यात आला आहे. ( स्टेला निशा गोगोईचे फोटो)
-
हे संग्राहलय पाहण्यासाठी ९६० रुपये तर लहान मुलांसाठी ७६० रुपये तिकीटांचे दर आहेत. ( फोटो अभिनव साहा )

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल