-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
-
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “२००३ मध्ये जेम्स लेन प्रकरण आलं. जेम्स लेनने बाबासाहेब पुरंदरेंसह बहुलकर, बनकवडे, भंडारी अशा अनेकांची नावं आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिली.”
-
या सर्वांनी मला माहिती दिली, मी यांचा आभारी आहे, असं त्या पुस्तकात म्हटल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
-
“याच पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी शंका निर्माण करून दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे खरे वडिल आहेत, असा पुण्यात विनोद सांगितला जात असल्याचं वाक्य त्यात घुसवण्यात आलं,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
-
“जेव्हा आम्ही त्याविरोधात लढाई सुरू केली तेव्हा त्या लढाईत पुरंदरेंच्या बाजूने एकच माणूस उभा राहिला. त्या माणसाचं नाव राज ठाकरे असं आहे,” असंही आव्हाड यांनी म्हटलं.
-
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात किती चुकीचं लिखाण झालंय हे आम्ही उदाहरणासह, पान क्रमांकासह दाखवलं.”
-
“या पुस्तकात सांगण्यात आलं की, पाच आण्याला चार कुणबीनी विकत मिळत असत, आपल्या सत्तेसाठी मराठे आपल्या आयाही पाठवायला कमी करणार नाहीत, शिवाजी महाराजांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आणि पंत प्रचंड तणावाखाली होते,” असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
-
“यात पंतांचा काय संबंध? ते काय घरातले आहेत का?” असा प्रश्न आव्हाडांनी विचारला.
-
आव्हाड म्हणाले, “पुरंदरेंनी पुस्तकात अशी वाक्य टाकली की, ज्यातून पंत हे घरातलेच आहेत.”
-
“त्यामुळे पुरंदरेंच्या मनातील जो हेतू होता तो जेम्स लेनने बोलून दाखवला होता,” असा आरोप आव्हाड यांनी केला.
-
“ते वाकड्या वाटा नेतील तिथपर्यंत जात होते. त्या पुरंदरेंचं समर्थन कोणी केलं, तर राज ठाकरेंनी केलं,” असाही आरोप आव्हाडांनी केला.
-
आव्हाड पुढे म्हणाले, “‘हर हर महादेव’ इतका विकृत चित्रपट महाराष्ट्राच्या चित्रपटभूमीवर आला नाही.”
-
“चित्रपटात दाखवलं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं नव्हतं,” असा आरोप आव्हाडांनी केला.
-
“शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेंची लढाई झाली नव्हती, तरी चित्रपटात लढाई झाल्याचं दाखवलं,” असाही आरोप त्यांनी केला.
-
ते पुढे म्हणाले, “अफजल खानाची संपूर्ण माहिती बाजीप्रभू देशपांडेंनी दिली होती, असं कोणत्याही पुस्तकात नाही.”
-
“असं असताना चित्रपटात तसं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मनात चलबिचल सुरू होती,” असं त्यांनी सांगितलं.
-
“कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना मराठ्यांचे पाटील शिरवळला बायकांचा बाजार करतात, असं चित्रपटात दाखवण्यात आलं,” असाही आरोप त्यांनी केला.
-
आव्हाड म्हणाले, “मुद्दाम मराठा समाजाचं शौर्य उंचीने कमी करण्याचा प्रकार या चित्रपटात सुरू होता.”
-
“महाराष्ट्रात मराठा विरुद्ध मराठी हा वाद कधीच नव्हता. मराठ्यांच्या शौर्याबद्दल उभ्या महाराष्ट्राला प्रचंड अभिमान आहे,” असंही मत आव्हाडांनी व्यक्त केलं.
-
यानंतर राज्यात यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
-
आता आव्हाडांच्या या आरोपांना राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (सर्व फोटो संग्रहित)

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण