-
तुमच्या घरामध्ये विजेचे किती प्लगइन्स आहेत. बरं घरं जाऊ द्या तुमच्या बेडरुमध्ये किती प्लगइन आहेत. मोबाईल चार्जिंग, इस्री वगैरे लावण्यासाठी ज्यामध्ये पीन लावून तुम्ही इलेक्ट्रीक प्लग सॉकेट विचारतोय आम्ही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं विचारण्याचं कारण काय. तर असं प्रश्न विचारण्याचं मुख्य कारण आहे सध्या चर्चेत असलेलं युनायटेड किंगडमधील एक घर.
-
मिडलसेक्समध्ये असणारे हे पाच बेडरुम असणारे घर विक्रीसाठी काढण्यात आले आहे. या घराची किंमत १७ कोटी ५० लाख इतकी आहे. मात्र याहून आश्चर्याची गोष्टमध्ये घराचे इंटीरियर. या घराचे आतून काढलेले फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत. पण हे घरं असं का आहे हे अनेकांना न उलगडलेलं कोडं आहे.
-
टॉबीने शेअर केलेली लिंक ही एक घर खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटची असून या लिंकवर या घराची माहिती देण्यात आली आहे. 'या घरातील कुटुंब दुसरीकडे रहायला गेलं आहे. हे घर विक्रीसाठी उपलब्ध आहे,' इतकीच माहिती या घराबद्दल देण्यात आली असून त्यासोबत घराचे काही फोटो देण्यात आले आहेत.
-
हेच फोटो आता ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहेत. या चर्चेच कारण म्हणजे या घरात गरजेपेक्षा खूप जास्त प्लग सॉकेट्स आहेत. म्हणजे अगदी घराच्या फ्लोअरपासून ते छतापर्यंत वाटेल तिथे प्लग सॉकेट्स बसवण्यात आले आहेत.
-
अनेकांना इतके सॉकेट्स घरात का बसवले आहेत असा प्रश्न पडला आहे.
-
एका ट्विटर युझरने 'हे एखादं इलेक्ट्रीक प्रशिक्षण केंद्र वाटतं आहे,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका युझरने 'इथे गुप्तचरखात्याचे कार्यलय होते का?' असा प्रश्न विचारला आहे.
-
या घरामध्ये अगदी जवळजवळ एकत्र अनेक प्लग सॉकेट्स लावण्यात आले आहेत. तर काही सॉकेट्स अगदी छतावर लावण्यात आले आहेत. पण या घरात इतके प्लग सॉकेट कोणत्या कारणासाठी लावले आहेत याचे उत्तर जाणून घेण्याचा नेटकरी प्रयत्न करत आहेत.
-
या घरामध्ये अगदी जवळजवळ एकत्र अनेक प्लग सॉकेट्स लावण्यात आले आहेत.
-
अगदी घराच्या फ्लोअरपासून ते छतापर्यंत वाटेल तिथे प्लग सॉकेट्स बसवण्यात आले आहेत.

India-Pakistan Tensions: सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग; दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ, पाणीसुद्धा हिसकावले