-
भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आले आहे.तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. विनेश महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम सामना खेळणार होती, परंतु सामन्यापूर्वी घेतलेल्या वजनात तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. (AP)
-
पॅरिस ऑलिम्पिकमधील या निर्णयाने संपूर्ण भारताच्या आशा भंगल्या आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले आहे, “विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझं अपात्र ठरवलं जाणं हे वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे दुख: होतं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (AP)
-
विनेश फोगटने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी तिने आपले वजन ५० किलोच्या आत कमी केले होते. विनेश फोगट मजबूत बॉडीसाठी कोणता डाएट फॉलो करते हे जाणून घेऊया. (AP)
-
काही काळापूर्वी विनेश फोगटने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला घरचे जेवण आवडते. तिच्या डाएट चार्टमध्ये पौष्टिक घरगुती अन्नाचा समावेश आहे. (Vinesh Phogat/FB)
-
याशिवाय विनेश फोगटला बटर आणि चटणी घरी बनवलेल्या रोटीसोबत खायला आवडते. प्रशिक्षणापूर्वी विनेश फोगट अंडी, ओट्स, टोमॅटो आणि ब्रेडचे सेवन करते. (AP)
-
दुपारी विनेश प्रथिनांसाठी रोटी, भाज्या आणि हरभरा, राजमा, दही आणि कोशिंबीर घेते. (AP)
-
विनेश फोगटला रात्रीच्या जेवणात रोटी, सॅलड आणि अंडी खायला आवडतात. (Vinesh Phogat/FB)
-
त्याच वेळी, जेव्हा तिला दुपारचे जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणा अगोदर भूक लागते तेव्हा ती ड्राय फ्रूट्स आणि प्रोटीन शेक घेते. (AP)
-
विनेश फोगट सकाळी आणि संध्याकाळी प्रशिक्षण करते. तिचे प्रशिक्षण खूप कठीण असते, कुस्तीचा सराव, वजन सराव आणि तीव्र कसरतींचा समावेश आहे. (Vinesh Phogat/FB)

Asia Cup 2025: आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर, शुबमन गिल उपकर्णधार; श्रेयस अय्यरला संधी नाहीच! पाहा स्क्वॉड