-
अजित पवारांनी कालच राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची व छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
-
सध्या नऊ आमदारांचा जाहीर पाठिंबा असलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीतुन दोन तृतीयांश आमदारांचा गट आपल्या पाठीशी असल्याचा सुद्धा दावा केला आहे.
-
महाराष्ट्र्र राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या अजित पवारांच्या शिक्षणापासून ते राजकीय कारकीर्दीपर्यंत अनेक प्रश्न कालपासून वारंवार समोर येत आहेत
-
राज्य सरकारच्या पोर्टल्सवर उपलब्ध माहितीनुसार आज नवनिर्वाचित उपमुख्यमंत्र्यांचा पगार किती हे जाणून घेऊया…
-
अजित पवार यांचा पगार (Maharashtra DCM Ajit Pawar Salary) : उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीस यांचा पगार साधारण ३ लाखापर्यंत आहे.
-
तसेच उपमुख्यमंत्र्यांना राज्य सरकारतर्फे मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता असे विविध भत्ते दिले जातात.
-
दुसरीकडे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगारही सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. याशिवाय त्यांना आमदार म्हणून एका महिन्याचे वेतनही दिले जाते
-
सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा मूळ पगार साधारण १ लाख ८० हजार इतका आहे.
-
याव्यतिरिक्त महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, असं मिळून हा आकडा २ लाख ३० हजारांच्या घरात जातो. शिवाय माजी आमदारांना ५० हजार पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद आहे.
बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल