-
आज अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पार पडले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. (Photo : Social Media)
-
ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता. तो क्षण सर्वांनी पाहिला. आज अभूरपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्य मंदिरात विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. (Photo : Social Media)
-
प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. (Photo : Social Media)
-
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरात याचे लाईव्ह प्रसारण दाखवण्यात आले. अनेक भक्त घरबसल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पाहत होते. (Photo : Social Media)
-
ज्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुर्ती अत्यंत सुंदर आणि नयनरम्य दिसत आहे.या रामलल्लाच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo : Social Media)
-
काही दिवसांपूर्वीच रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली होती. काळ्या पाषाणात बनवलेली ही मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. (Photo : Social Media)
-
रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. ते प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. या मूर्तीचे वजन २०० किलो असून या मूर्तीची उंची ४.२४ फूट आणि रुंदी ३ फूट आहे. (Photo : Social Media)
-
या उद्घाटनाच्या प्रसंगी राम मंदिर खूप सुंदररित्या सजवले आहे. या सोहळ्यात अनेक कलाकार, व्यावसायिक, राजकीय नेते, खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली. (Photo : Social Media)
-
राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा संपूर्ण देशासाठी भावनिक क्षण आहे. ज्या राम मंदिरासाठी १०० हून अधिक काळ वाद सुरू होता. तो वाद आता संपुष्टात आला असून एक नवी सुरूवात होत आहे. (Photo : Social Media)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच