scorecardresearch

Premium

EVM Machines : शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक; ईव्हीएम मशीनविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवणार

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांच्या मनातील ईव्हीएम मशीनबद्दलची शंका समजून घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले.

sharad pawar residence meeting
शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक गुरुवारी (दि. २३ मार्च) संपन्न झाली. निवडणूक आयोगासमोर जाऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) विरोधकांचे आक्षेप पुन्हा एकदा लेखी स्वरूपात मांडण्याचा ठराव या बैठकीत संमत झाला. जगातील प्रत्येक मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते, या आपल्या जुन्या विचारावर विरोधक अद्यापही ठाम असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला काँग्रेस समाजवादी पक्ष, जेडीयू, आप, सीपीआय, सीपीएम, शिवसेना (यूबीटी), बीआरएस, आययूएमएल या पक्षातील नेते आणि कपिल सिब्बल उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांच्या मनातील ईव्हीएम मशीनबद्दलची शंका समजून घ्यावी. ईव्हीएम मशीन्स या बाह्ययंत्रणेशिवाय (standalone) चालणाऱ्या आहेत, असे निवडणूक आयोग सांगत असले तरी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करता येतो. इंटरनेटच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनवरील नावे आणि पक्षाच्या चिन्हामध्ये गडबड होऊ शकते.

congress leaders, remembering Vilasrao deshmukh
‘साहेब’ तुम्ही हवे होतात…पडझडीच्या काळात काँग्रेस नेत्यांना विलासरावांची आठवण
kamal nath bjp entry
कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा; पण भाजपाला नेमका फायदा काय?
Amar Rajurkar slams Congress committee
Ashok Chavan : “अध्यक्षांच्या पुढे पुढे करणाऱ्या त्या लोकांमुळे…” चव्हाणांचे निकटवर्तीय राजूरकर यांचे आरोप
narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे

तसेच या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, विरोधकांची अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाने आमच्या मागणीची दखल घ्यावी. सिब्बल म्हणाले की, मागच्या काही काळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरे निवडणूक आयोगाकडून येणे अपेक्षित आहे.

सिब्बल पुढे म्हणाले, “आम्ही पुन्हा एकदा निवडणूक आयोगापुढे जाऊ. निवडणूक आयोगाने आम्हाला लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी करणार आहोत. जर आयोगाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही, तर मग भविष्यात कोणती पावले उचलायची, याचा विचार करू. जगातील कोणत्याही मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते. जगभरातील युरोप, यूके, यूएस यांसारख्या मोठ्या लोकशाही देशांमध्ये निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरली जात नाहीत. यातच सर्व आले.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aap brs congress sp among parties at sharad pawar evm meeting kvg

First published on: 24-03-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×