दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या रणनीतीमुळे शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभ‌व झाला आणि भाजपला अतिरिक्त जागेचा फायदा झाला होता. या वे‌ळी काँग्रेसला धक्का देण्याची योजना भाजपने आखली आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसचे आणखी किती आमदार निवडणुकीपर्यंत राजीनामे देतात यावर सारी गणिते अवलंबून आहेत. राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या आमदारांना खुल्या पद्धतीने मतदान करावे लागते. म्हणजेच पक्षाने नेमलेल्या प्रतोदाला मतपत्रिका दाखवावी लागते. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केल्यास अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर राहते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने फार नियोजनबद्ध रणनीती आखली होती. मतांची वाटणी करताना केलेले गणित भाजपला उपयोगी पडले. भाजपने पहिल्या दोन उमेदवारांना प्रत्येकी ४८ मते दिली होती. तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली होती. पहिल्या पसंतीच्या ४१ मतांची तेव्हा विजयासाठी आवश्यकता होती. पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना मिळालेल्या अतिरिक्त ७.२८ मतांमुळे महाडिक यांना दुसऱ्या पसंतीची १४.५६ मते मिळाली. या अतिरिक्त मतांमुळे भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता.

हेही वाचा : बिहारमध्ये रंगले सत्तानाट्य; बहुमत चाचणीवेळी राजदचे तीन आमदार बसले सत्ताधारी बाकावर, नक्की काय घडले?

BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”

यंदा महायुतीला सहापैकी पाच जागा सहजपणे मिळू शकतात. भाजपचे तीन तर शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. सहावा उमेदवार काँग्रेसचा निवडून येऊ शकतो. पण अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची जागा अडचणीत येऊ शकते. सध्या काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे काँग्रेसबरोबर राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. अशोक चव्हाण यांना मानणारे पाच ते सहा आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदारांचे राजीनामे झाल्यास काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकते. अशा वेळी मतांचा कोटाही कमी होईल. महायुती अशा वेळी मतांची योग्यपणे वाटणी करून सहावा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू शकते.

हेही वाचा : अशोक चव्हाण यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; आता त्यांच्यावरील तीन खटल्यांचं काय होणार? 

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. याचा अर्थ गोगावले यांचा पक्षादेश ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होऊ शकतो. अर्थात, ठाकरे गटाचा त्याला आक्षेप आहे. राष्ट्रवादीतील बंडाबाबत बुधवारी निकालपत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद म्हणून अनिल पाटील यांना मान्यता दिल्यास शरद पवार गटाच्या आमदारांना कोणता पक्षादेश लागू पडू शकतो याचा वाद निर्माण होईल. यामुळेच महाविकास आघाडीकडे शिवसेना ठाकरे गट १५ आणि शरदचंद्र पवार गटाकडे १० मते अशी एकूण २५ मते अतिरिक्त असली तरी ती काँग्रेसला मिळाली तरी ही मते वैध ठरतील का, असे अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. या सर्व राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसला हक्काची राज्यसभेची जागा कायम राखता येईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मतांचा कोटा किती ?

एकूण सदस्यसंख्या – २८८
जागा रिक्त – ४
एकूण मतदार – २८४
पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता – ४०.५८ मते