तुकाराम झाडे

आपण शिवसेना पक्ष प्रमुखांबरोबरच असून तोच आपला श्वास आहे, असे डोळयांत पाणी आणून सांगणारे संतोष बांगर विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी रात्री दीड वाजता फोन करून शिंदे गटात सहभागी झाले. हिंगोलीतील शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे लक्षात आल्यानंतर संपर्कप्रमुखांनी मेळावे घेतले. निष्ठेच्या आणाभाका झाल्या असल्या तरी आता सत्तेची लढाई अधिक तीव्र होण्याचे चिन्हे आहेत. पण नेते फुटतात आणि सेना टिकते असाच हिंगोली जिल्ह्यातील सेनेचा इतिहास आहे. शिवसैनिक ‘मातोश्री’ च्या पाठीशी असताना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांना बळ दिल्याने हिंगोलीत शिवसेना पक्ष संघटनेवरील नियंत्रणासाठीचा संघर्ष टोकदार होईल असे चित्र  आहे.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर

हेही वाचा-महाविकास’च्या नेत्यांनाही ‘बांठिया’ अहवाल अमान्य

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी सुरुवातीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर करून  त्यावरून कौतुकाचे हारतुरे घेतले. त्यानंतर अचानक शिंदे गटात कोलांटउडी मारल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्याच पदावर कायम केल्याची घोषणा केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील अस्तित्वाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जिल्ह्याच्या शिवसेनेत आता खासदार हेमंत पाटील हे एकखांबी शिलेदार उरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शक्ती प्रदर्शनासाठी गेलेल्या गटात जिल्हा परिषदेतील गटनेते व जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव आहेर यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या १६ माजी सदस्यांपैकी १४ सदस्य हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. संतोष बांगर यांच्या समर्थनार्थ तसे फार कमी कार्यकर्ते असल्याचे त्यांच्या शक्ती प्रदर्शनातून दिसून आले होते. राजकीय घटनांचा वेग लक्षात घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. मात्र, गद्दार आणि हकालपट्टी या सेनेच्या कृतीवर उत्तर देण्यासाठी बांगर यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर शक्ती प्रदर्शन केले. या वेळी संतोष बांगर यांच्यासोबत राम कदम, राजेंद्र शिखरे, राम नागरे, अशोक नाईक, फकीरा मुंढे असे सेनेतील मोजकेच पदाधिकारी सहभागी होते.

हेही वाचा- शिवसेना आणि अण्णा द्रमुक एकाचवेळी दोन प्रादेशिक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

असे होण्यामागे शिवसेना सोडून जाणाऱ्यांचा राजकीय इतिहासही कारणीभूत आहे. दिवंगत माजी खासदार विलास गुंडेवार यांनी शिवसेना सोडली, त्यानंतरच्या निवडणुकीत शिवाजी माने शिवसेनेकडून निवडून आले. माने यांनी शिवसेना सोडली तेव्हा सुभाष वानखेडे निवडून आले. वानखेडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि आता विद्यमान खासदार हेमंत पाटील निवडून आले. कळमनुरी विधासभा मतदारसंघात मारोती शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या जागी गजानन घुगे निवडून आले. घुगे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर विद्यमान आमदार संतोष बांगर हे निवडून आले. जुना माणूस बाजूला पडतो पण विजय मात्र शिवसेनेचाच होतो, असा इतिहास आहे.हिंगोलीत शिवसेनेची ताकद किती ?

हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे कायमच वर्चस्व होते. सभागृहात शिवसेनेचे सर्वाधिक सोळा सदस्य असल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. जि.पचा कार्यकाळ संपल्याने येथे सध्या प्रशासक नेमण्यात आला आहे. वसमत, कळमनुरी नगरपालिकेतही प्रशासकांचा कारभार आहे. या दोन्ही नगरपालिकांत सेनेचे अध्यक्ष होते, तसेच औंढा नागनाथ, सेनगाव नगरपंचायतीत सेनेचे नगराध्यक्ष आहेत. औंढ्याचे नगराध्यक्ष आमदार बांगर यांच्यासोबत तर सेनगावचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटात आहेत.