भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्ज्वल देवराव निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल देवराव निकम हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील होते. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. त्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. खरं तर पूनम महाजन या भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे उज्ज्वल निकम यांनी हाताळलेल्या असंख्य प्रकरणांपैकी एक म्हणजे भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचे प्रकरण होते. प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेतलेल्या अनेक ठळक प्रकरणांत निकम यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब विरुद्धच्या खटल्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील म्हणून ते ओळखले जातात. निकम यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकरणांची गुंतागुंत सोडवण्यात मदत केली आहे. २०११ चा तिहेरी बॉम्बस्फोट, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणांसह अनेक प्रकरणांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचाः नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना

“मी पूनम महाजन यांना चांगला ओळखतो, कारण त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या खटल्यादरम्यान राज सरकारकडून मी प्रतिनिधित्व केले होते. त्या किती मेहनती आहेत हे मी खटल्याच्या वेळी पाहिले होते. त्यांना खूप अनुभव आहे. मी आता मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने मला त्यांची मदत मिळेल, अशी आशा आहे, असे निकम यांनी शनिवारी मुंबई उत्तर मध्य लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तीन दशकांहून अधिक काळ वकील म्हणून राजकीय पक्षात सामील होण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल निकम म्हणाले की, ही एक मोठी जबाबदारी आहे, मला माहीत आहे, पण त्याला तोंड देण्यासाठी मी तयार आहे, असंही त्यांनी अधोरेखित केले.

“मी लोकांच्या विशेषत: उत्तर मध्य मुंबईतील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि लोकसभेत त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करेन. मी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे आणि जे देशविरोधी आहेत त्यांच्या विरोधात मी आवाज उठवत राहीन. मला गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे,” असंही उज्ज्वल निकम यांनी अधोरेखित केले. निकम यांनी जळगाव येथे दिवाणी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेथे त्यांनी कायद्याची पदवीही घेतली. १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी मुंबईत सुरू झाली, तेव्हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. या खटल्यात त्यांनी काही साक्षीदारांची तपासणी केली आणि साक्ष नोंदवली. २६/११ च्या दहशतवादी खटल्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे निकम भारतातील घराघरात पोहोचले आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही त्यांनी प्रसिद्धी मिळाली.

हेही वाचाः उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!

कसाब प्रकरणात त्यांचे नाव चांगलेच गाजले होते. अनेकांनी निकम यांच्यावर खटल्याच्या वेळी त्यांच्या अतिउत्साही वागणुकीबद्दल टीका केली. अजमल कसाब तुरुंगात बिर्याणीची मागणी करतो आणि त्यानंतर त्याची व्यवस्थाही केली जाते, अशी अफवा आपण पसरवली होती, अशी कबुली खुद्द उज्ज्वल निकम यांनीच दिली होती. अखेर मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबलाही फाशी देण्यात आली होती. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच अनेक पीडित कुटुंबांनी त्यांना खटल्यांमध्ये फिर्यादी म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. अलिकडच्या वर्षांत निकम यांच्याकडे कोणतेही महत्त्वाचे खटले आणि प्रकरणं नाहीत. त्यामुळेच त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय. उज्ज्वल निकम हे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, मरिन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण, गुलशन कुमार हत्या प्रकरण अशा अनेक हायप्रोफाईल केसेसमध्ये सरकारी वकील होते. याशिवाय २०१० मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादावर झालेल्या जागतिक परिषदेतही त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी गँगस्टर अबू सालेम केस, शक्ती मिल गँगरेप केस आणि डेव्हिड हेडली प्रकरणातही खटले लढवले. ते खून अन् दहशतवादाच्या प्रकरणांमधील तज्ज्ञ समजले जातात. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीवरील बाइटसाठी निकम हे दूरचित्रवाणी वाहिन्यांचे मुख्य आधार झाले आहेत.