छत्रपती संभाजीनगर: सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यासमोर सहाव्या वेळी उमेदवार कोण उतरवायचा याचा निर्णय काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना अजून घेता आलेला नाही. माजी आमदार कल्याण काळे यांच्या नावावर जिल्ह्यातील नेत्यांनी सहमती दर्शवूनही १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, निर्णयच होत नसल्याने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या पूर्वी कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दोनदा निवडणूक लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. सलग पराभव होणाऱ्या या मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे देण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, काँग्रेसच ही जागा लढवेल असे वारंवार सांगण्यात आले होते.

१९९९ पासून रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघ कायम राखला आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केले होते. त्यानंतर उत्तमसिंग पवार, कल्याण काळे, विलास औताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केले. जालना जिल्ह्यात १९९९ मध्ये सर्वाधिक ७२.४८ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये रावसाहेब दानवे ५७.७३ टक्के मतदान घेऊन निवडून आले होते. आता पुन्हा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असेल अशी विचारणा केली जात आहे.

Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
K C Venugopal came to have a seat at the Congress high table
कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – LS Election 2024: “लोकशाहीसाठी ‘जिंका वा मरा’ अशी निवडणूक”, मोदी सरकार विरोधात स्टॅलिन यांचे रणशिंग!

१९९१ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आठ वेळा या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. १९८९ मध्ये पुंडलिक हरि दानवे, १९९६ व १९९८ च्या निवडणुकीमध्ये उत्तमसिंग पवार, यांच्यानंतर हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांच्या पाठिशी उभा असल्याचा इतिहास आहे. या वेळीही रावसाहेब दानवे यांचे राजकीय विरोधक समजली जाणारी मंडळी ‘महायुती’मध्ये सहभागी आहेत.

हेही वाचा – कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधातील रोष काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभा राहू शकतो असा कयास बांधून उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली. या मतदारसंघातून ‘ओबीसी’ उमेदवार द्यावा की मराठा उमेदवार द्यावा यावरुन काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय पटावर अनेक हालचाली सुरू असल्या तरी जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये सारे काही शांत शांत असे चित्र दिसून येत आहे.दरम्यान उमेदवार व्हा, असा निरोप आला तर तयारी असावी म्हणून डॉ. कल्याण काळे यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.