गेल्यावर्षी ३० डिसेंबर रोजी जुन्या म्हैसूरमधील वोक्कालिंगा येथे भाजपा नेते अमित शाह यांनी सभा घेत एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली होती. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि जेडी(एस)वर जोरदार टीका केली. दोन्हीही पक्ष जातीयवादी आणि भ्रष्ट असल्याचे अमित शाह म्हणाले होते. तसेच भाजपाची थेट काँग्रेसशीच लढत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीच अमित शाहांचा रोख बघता भाजपाने जुन्या म्हैसूरमधील जागांवर विशेष लक्ष केंद्रीय दिसून येत आहे. यामुळे काँग्रेस आणि जेडी(एस)ची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या जुन्या म्हैसूरमध्ये अमित शाहांनी सभा घेतली, त्या मतदार संघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? आणि आगामी निविडणुकीसाठी तिन्ही पक्षांची तयारी नेमकी कशी आहे? समजून घेऊया.

हेही वाचा – ‘भाजपाचं काम द्वेष पसरवणं, भारताला मात्र बंधुता प्रिय’, पंजाबमध्ये येताच राहुल गांधीचा हल्लाबोल

Sunetra Pawar, Files Nomination, Baramati lok sabha seat, Ajit Pawar Announces Campaign Chiefs, mahayuti Campaign Chiefs for baramati, baramati campaign, lok sabha 2024, election 2024, baramati news, pune news, marathi news, politics news,
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर
Bodies of 18 naxals recovered from encounter site
लोकसभा निवडणुकीच्या आधी कांकोरमध्ये १८ नक्षलींचा खात्मा, एक कमांडरही ठार, सीआरपीएफची मोठी कारवाई
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

२०१८ मध्ये कोणाला किती जागा?

जुन्या म्हैसूरमध्ये नेहमीच एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडी(एस) आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. येथील जागांवर आजपर्यंत भाजपाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्या म्हैसूर भागातील ५८ जागांपैकी काँग्रेसने १८, जेडी(एस)ने २० तर भाजपाला १२ जागांवर विजय मिळवता आला. तसेच बंगळुरूमधील २८ जागांपैकी काँग्रेसला १५, जेडी (एस)ला १ तर भाजपाने १५ जागांवर विजय मिळवला होता. या भागातील नेहमीच भाजपाची निराशजनक राहिली आहे. त्यामुळे भाजपाला आजपर्यंत कर्नाटकमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

जेडी (एस) भाजपाची बी टीम; काँग्रेसचा आरोप

भाजपाचा वाढती ताकद आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मिळालेलं जनसमर्थन बघता जेडी(एस) ने जुन्या म्हैसूर भागावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसच्य भारत जोडो यात्रेला प्रत्युत्तर म्हणून जेडी (एस) कडून पंचरत्न यात्रा सुरू करण्यात आली आहे. तर जेडीएस ही भाजपाची बी टीम असून भाजपाचा जेडीएसला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – नितीश कुमारांच्या समाधान यात्रेत ‘भावी पंतप्रधान’ची घोषणाबाजी; विषारी दारूने त्रस्त सारण जिल्ह्यातील लोकांमध्ये मात्र नाराजी!

भाजपासाठी निवडणूक आव्हानात्मक?

दरम्यान, याबाबत बोलताना भाजपचे राज्य सरचिटणीस अश्वथनारायण म्हणाले, ”भाजपाला कर्नाटकमध्ये स्पष्ट बहुमत हवं असेल तर जुन्या म्हैसूर भागात भाजपाला जास्तीत जास्त जागी जिंकण्यावर भर द्यावा लागेल”. एकंदरीच जुन्या म्हैसूर येथील राजकीय परिस्थिती बघता भाजपासाठी ही निवडणूक आव्हानात्मक राहील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.