काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता लवकरच हे निलंबन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी (३० ऑगस्ट) संसदेच्या विशेषाधिकार समितीने हे निलंबन मागे घेण्याची एकमताने शिफारस केली आहे. विशेषाधिकार समिती हीच शिफारश लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करणार आहे. त्यानंतर ओम बिर्ला योग्य तो निर्णय घेतील.

प्रल्हाद जोशी यांच्याकडून निलंबनाचा प्रस्ताव

चौधरी हे काँग्रेसचे लोकसभेतील खासदार आहेत. संसदेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणल्याचा आरोप करून त्यांच्यावर १० ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदेत ठेवला होता. जेव्हा-जेव्हा मोदी बोलत होते, तेव्हा-तेव्हा अधीर रंजन चौधरी हे अडथळा निर्माण करत होते, असे त्यावेळी प्रल्हाद जोशी म्हणाले होते.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

संसदेच्या विशेषाधिकार समितीपुढे मांडली बाजू

निलंबनाची कारवाई केल्यानंतर हे प्रकरण नंतर संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले होते. या समितीपुढे चौधरी यांनी आपली बाजू मांडली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा होतू नव्हता. पश्चिम बंगालमधील नेते हे भाषणादरम्यान किंवा काही बोलताना शाब्दिक कोट्यांचा उपयोग करतात. मी केलेली विधाने ती याच अंगाने पाहावीत, असे चौधरी म्हणाले होते. तसेच संसदेत मी केलेली विधानं लोकसभा अध्यक्षांनी अगोदरच रेकॉर्डमधून काढून टाकली आहेत, असेही त्यांनी समितीला सांगितले.

“संसदेत नेहमीच शाब्दिक कोट्या…”

दरम्यान, निलंबनाची कारवाई केल्यानंतर अधीर रंजन रंजन चौधरी यांनी आपली भूमिका मांडली होती. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला होता. “मी चूक केल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घ्यायला तयार आहे. आम्ही संसदेत नेहमीच शाब्दिक कोट्या करत असतो. संसदेतील भाषणादरम्यान आमची भाषा श्रृंगारिक असते. तसेच आम्ही वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार वापतो,” असे चौधरी म्हणाले होते.

“मणिपूरच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी मी बोललो”

“मी संसदेत काय म्हणालो? राजाने धृतराष्ट्राप्रमाणे अंधळे होऊ नये. आपल्या राज्यात महिलांसोबत काय दुष्कृत्य घडत आहेत, ते पाहावे. मग ते हस्तिनापूर असो किंवा मणिपूर, असे मी म्हणालो होतो. मी मोदी यांना शिवीगाळ केलेली नाही. मणिपूरच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी मी असे म्हणालो होतो,” असे तेव्हा अधीर रंजन चौधरी म्हणाले होते.

“…तर राजकाणातून संन्यास घेईन”

“नीरव मोदी याने देशातून पळ काढला. नीरव म्हणजे जो शांत असतो. मोदी हे चित्त्याबाबत बोलत असतात. मात्र ते मणिपूरच्या मुद्द्यावर शांत आहेत, असे मी म्हणालो होतो. यात काही चूक असेल तर मी राजकारणातून संन्यास घ्यायला तयार आहे,” असे तेव्हा अधीर रंजन चौधरी म्हणाले होते.

अन्य दोन खासदारांवरही केली होती निलंबनाची कारवाई

पावसाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या दोन दिवसांत अधीर रंजन चौधरी यांच्यासह आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राखव चढ्ढा यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यासह आपचे दुसरे खासदार संजय सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या निलंबनाचे प्रकरण विशेषाधिकार समितीपुढे अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांच्या निलंबनाला मुदतवाढ देण्यात आली आहे.