शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यात आपले मुख्यालय थाटले. या कार्यालयाला बाळासाहेब भवन असे नाव देण्यात आले. कार्यालय अगदी चकाचक. काचेची तावदाने, चकचकीत खूच्र्या, आर्कषक पेंटींग, शुभ्रधवल रंग, चमकणारे दिवे असा या मुख्यालयाचा थाट आहे. अलिशान अशा मुख्यालयाची स्वच्छता कायम राहावी यासाठी पादत्राणे घालून कार्यालयात जाता येत नाही. पादत्राणे बाहेर काढण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यासाठी एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. इथपर्यंत सारे ठिक. पण कार्यालयात येणारे नेते व कार्यकर्त्यांना वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. कारण आत जाताना बाहेर काढलेली पादत्राणे बाहेर आल्यावर गायब झाल्याचे प्रकार वाढले आहेत. पादत्राणे गायब होत असल्याने तेथे येणाऱ्या कार्यकर्त्यांचे अर्धे लक्ष पादत्राणांवर असते. पादत्राणे बाहेर काढण्याची सक्ती कशाला? हे काय मंदिर आहे का? अशी कार्यकर्त्यांची संतप्त भावना आहे.
चावडी: बाळासाहेब भवन की ?
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यात आपले मुख्यालय थाटले. या कार्यालयाला बाळासाहेब भवन असे नाव देण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-03-2024 at 02:54 IST
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chavdi chavadi happening in maharashtra politics news on maharashtra politicsamy