मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी शिवराजसिंह चौहान यांच्याकडे सोपवणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, भाजपाचे नेते मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. दरम्यान, तब्बल २० वर्षे मध्य प्रदेशचा कारभार सांभाळणारे शिवराजसिंह चौहान नेमके काय करणार? भाजपा त्यांच्यावर काय जबाबदारी सोपवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाच त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आगामी काळातील जबाबदारीबद्दल नड्डा आणि चौहान यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

शिवराज यांच्यावर दक्षिणेकडील राज्यांची जबाबदारी?

ही बैठक संपल्यानंतर चौहान यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. पक्षासाठी काम करणे ही एक मोहीम आहे. मी कोणती जबाबदारी पार पाडावी हे ठरविण्याचा अधिकार मला एकट्याला नाही, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक पाहता, शिवराजसिंह चौहान यांच्यावर दक्षिणेकडी राज्यांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. दक्षिणेकडच्या राज्यांत भाजपाचा म्हणावा तेवढा प्रभाव नाही. त्यामुळे या राज्यांत पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून शिवराजसिंह चौहान यांच्याकडे या भागात पक्षाचा प्रचार करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

भाजपाची विकसित भारत संकल्प यात्रा

चौहान सध्या तरी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन लोकांशी संवाद साधणार आहेत. सध्या लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केलेल्या कामांची, तसेच राबवलेल्या योजनांची माहिती या यात्रेच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे.

“मी दक्षिणेकडील राज्यांत जाणार”

या यात्रेबद्दल चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विकसित भारत संकल्प यात्रेसाठी माझे वेळापत्रक तयार केले जात आहे. मी दक्षिणेकडील राज्यांत जाणार आहे. पक्ष मला जो आदेश देईल, ते काम मी करणार आहे. मग ते केंद्रीय पातळीवर असो किंवा राज्य पातळीवर, दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे,” असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी सोपवली जाणार?

चौहान यांच्यावर सोपवल्या जाणाऱ्या संभाव्य जबाबदारीबाबत पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. चौहान यांच्यावर पक्षासाठी प्रचार करण्याचे काम सोपवले जाणार आहे. तसेच पक्षासाठी संघटनात्मक काम करण्याचाही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. सध्या तरी त्यांच्यावर दक्षिणेतील राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवराजसिंह चौहान हे उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांतून येतात. असे असताना दक्षिण भारतात पक्षाचा प्रचार करणे त्यांच्यासाठी काहीसे आव्हानात्मक असणार आहे.

पक्षाला अनुभवी नेत्याची गरज

“याआधी साधारण १५ महिन्यांसाठी शिवराजसिंह चौहान यांचे मुख्यमंत्रिपद गेले होते. त्यानंतर त्यांची भाजपाच्या सदस्यत्व मोहिमेचे संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा ते भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षदेखील होते. सध्या चौहान हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे अशीच एखादी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कारण- लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पक्षाला अनुभवी नेत्याची गरज आहे,” असे भाजपातील एका नेत्याने सांगितले.

चौहान यांच्यावर एक किंवा दोन राज्यांची जबाबदारी?

शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी न लागल्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाणार का, असे विचारले जात होते. मात्र, सध्या तरी मोदी सरकार आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता कमी आहे. काही मंत्र्यांकडे अन्य मंत्रालयांचा अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लक्षात घेता, चौहान यांच्यावर एक किंवा दोन राज्यांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

“चौहान यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही”

भाजपाच्या अन्य एका नेत्याने शिवराजसिंह चौहान यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. शिवराजसिंह यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण- त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केलेला आहे. त्यांच्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. कोणताही विरोध न करता, त्यांनी हा निर्णय स्वीकारलेला आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात त्यांनी वक्तव्यही केलेले नाही. चौहान यांना आता नवी सुरुवात करायची आहे, असे या नेत्याने म्हटले.