पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा कदाचित याचवर्षीच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली. या विधानावर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख प्रक्षांनीही प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील ममता बॅनर्जी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. ममता बॅनर्जी जे बोलल्या, तेच मी मागच्या सात-आठ महिन्यांपासून सांगत आहे, असे नितीश कुमार म्हणाले.

“हीच बाब मी मागच्या ८ महिन्यांपासून सांगतोय”

नालंदा मुक्त विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी “ममता बॅनर्जी यांनी जे सांगितले आहे, तेच मी साधारण ७ ते ८ महिन्यांपासून सांगत आहे. केंद्रातील एनडीए सरकार लोकसभेच्या निवडणुका लवकर घेण्याची शक्यता आहे. जास्त दिवस वाट पाहिल्यास भाजपाचे जास्त नुकसान होईल, असे त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटते,” असे नितीश कुमार म्हणाले.

maldives president mohamed muizzu marathi news
विश्लेषण: मालदीवमध्ये चीनधार्जिण्या अध्यक्षांचा ‘दुसरा’ विजय… भारतासाठी हा निकाल किती महत्त्वाचा?
dubai flood effect
पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?
Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

“आघाडीत जास्तीत जास्त पक्ष यावेत, हीच माझी इच्छा”

“याच कारणामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. भाजपाच्या पराभवासाठी सर्वांनची एकत्र येणे गरजेचे आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की मला काहीही नको. मला कोणतेही पद नको. विरोधकांच्या आघाडीत जास्तीत जास्त पक्षांचा समावेश व्हावा, हीच माझी इच्छा आहे,” असे नितीश कुमार म्हणाले. यासह त्यांनी लवकरच विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीत आणखी पक्षा सामील होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र ते पक्ष कोणते असतील, याची कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही.

“मुंबईच्या बैठकीनंतर आघाडी आणखी मजबूत”

“विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. आमच्या इंडिया आघाडीची येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ही आघाडी आणखी मजबूत होणार आहे,” असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

“अन्य राज्यदेखील अशा प्रकारे सर्वेक्षण करतील”

दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या जातीय सर्वेक्षणावर त्यांनी भाष्य केले. जातीय सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच या सर्वेक्षणाचा अहवाल प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. “सध्या हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात येईल. या सर्वेक्षणाची माहिती समोर आल्यानंर वंचित घटकांच्या कल्याणासाठी राज्य सरकारला काम करता येईल. तसेच या सर्वेक्षणाच्या मदतीने कोणत्या क्षेत्रात आणखी काम करणे गरजेचे आहे, हेदेखील समजेल. या सर्वेक्षणासंदर्भातील डेटा एकदा प्रदर्शित होऊ देत. मला विश्वास आहे की, अन्य राज्यदेखील अशा प्रकारचे सर्वेक्षण करतील,” असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) रोजी पक्षाच्या युवक मेळाव्याला संबोधित करत असताना भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा कदाचित याचवर्षीच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडून देशभरात हेलिकॉप्टर्स बुक करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही लागू करेल, असा इशारा युवक मेळाव्यात बोलत असताना त्यांनी दिला.